no images were found
जिल्ह्यात 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी कालावधीत महासंस्कृती महोत्सव
कोल्हापूर : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव दिनांक 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये शाहू मिल, बागल चौक येथे होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी महासंस्कृती महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महासंस्कृती महोत्सवाचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.
महोत्सवामध्ये महाराष्ट्र संस्कृती दर्शन दालन, शिवकालीन आज्ञापत्रे व इतर पत्रव्यवहार दालन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दालन, गडकोट किल्ले छायाचित्र प्रदर्शन दालन, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन दालन, पारंपरिक वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला प्रदर्शन (बांबूकाम) दालन, कृषीविषयक उत्पादन दालन, पर्यटक विषयक दालन, हस्तकला प्रदर्शन (मातीकाम) दालन व ऐतिहासिक पुस्तके, ग्रंथ दालन अशी विविध कलादालने 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहेत.
महासंस्कृती महोत्सवामध्ये आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी शाहिरी व लोककला सादरीकरण दुपारी 4 ते सायं. 6 पर्यंत व महाराष्ट्राच्या पाऊलखुणा सायं. 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
दिनांक 1 फेब्रुवारी 2024 गौरव माय मराठीचा कार्यक्रम दुपारी 4 ते सायं. 6 वाजेपर्यंत व दास्ता ए हिंदुस्थान सायं. 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी शाहीरी व लोककला सादरीकरण दुपारी 4 ते सायं. 6 पर्यंत व जागर लोक कलेचा कार्यक्रम सायं. 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी मुद्राभद्राय राजते गाथा शिवशाहीची कार्यक्रम दुपारी 4 ते सायं. 6 वाजेपर्यंत व गुढी महाराष्ट्राची कार्यक्रम सायं. 6 ते 10 वाजेपर्यंत.
दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी स्वराज्य संस्थापक (श्रीमंतयोगी) कार्यक्रम सायं. 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत होणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.