Home सामाजिक राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडा अंतर्गत स्पर्श जनजागृती अभियान

राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडा अंतर्गत स्पर्श जनजागृती अभियान

3 second read
0
0
57

no images were found

राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडा अंतर्गत स्पर्श जनजागृती अभियान

 

कोल्हापूर  : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडा अंतर्गत स्पर्श जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

 समाजामध्ये कुष्ठरोगाबाबत असणा-या अंधश्रध्दा, गैरसमज, भीती दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून, महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दि. 30 जानेवारी 2024 रोजी मॅरेथॉन (दौड) स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 14 ते 17 वयोगटातील विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. स्पर्धा सकाळी ठिक 8 वाजता आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र शेंडापार्क, कोल्हापूर येथून सुरु होणार आहे.

मॅरेथॉन स्पर्धेसाठी बक्षीस- प्रथम क्रमांक 8 हजार रुपये, व्दितीय क्रमांक 5 हजार रुपये व तृतीय क्रमांक 3 हजार रुपये या प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे. (सदर बक्षीसाची रक्कम मुले व मुलींना विभागून देण्यात येईल) सर्व कार्यक्रम सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कोल्हापूर, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकाच्या वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…