no images were found
परवाना लेट फीमध्ये महापालिकेच्यावतीने सवलत योजना
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या परवाना विभागाकडील थकबाकीदार असणा-या विविध परवाना धारकांचे परवाना लेट फीमध्ये सवलत योजना मंजूर कण्यात आली आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेने ही सवलत योजना जाहिर करण्यात आली आहे. शहरात महापालिकेच्यावतीने 101 व्यवसायांना परवाना दिला जातो. यामध्ये व्यवसाईकांनी दि.1 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत लेट फीमध्ये 50 टक्के व दि.01 ते 31 मार्च 2024 पर्यंत 30 टक्के सवलत देण्यात आली आहे. यासाठी https://web.kolhapurcorporation.gov.in/login यावर Online Payment करण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदरची सवलत योजनेची ही शेवटची संधी असलेने या सवलत योजनेचा जास्तीत जास्त परवाना धारकांनी व थकबाकीदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.