
no images were found
कुणाच्या ही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिला जाणार :- उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर (प्रतिनिधी) :- कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं जाणार हे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असल्याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले .
सरकारची कोणतीही मिलीभगत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
घरातील दोन भावांमध्ये देखील वाद होतात मात्र त्यावर बसून मार्ग काढतात. मराठा आरक्षणबाबत काही जणांना हे थांबावं असं वाटत नसावं. म्हणून जण काही जण बोलत असतील त्यांना वेदना होत असतील. हा असा म्हटला तो तसा म्हटला या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही, या शब्दात अजित पवार यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला फसवल्याची टीका केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांना विरोध करणारा मंत्री बरखास्त करा, असंही त्यांनी म्हटलं.
मराठ्यांना देण्यात आलेल्या अध्यादेशावर बोलताना अजित पवार म्हणाले, काल प्रफुलपटेल यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. कोणत्याही समाजाला नाराज करून चालत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगितलं आहे. मी, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलू. कुणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नाही, मुंबईत गेल्यावर बोलीन, असं सांगितलं.
ते पुढे म्हणाले, विरोधकांना टीका करण्याशिवाय आता दुसरं काही काम राहिलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी काम केलं आहे. विरोधकांमध्ये एकी राहिली नाही ममता बॅनर्जी अखिलेश यादव हे आता वेगळी भूमिका मांडत आहेत.
विरोधकांनी टीकाटिप्पणी करत बसावं आम्ही आमचे काम करत राहणार असल्याचं ते म्हणाले.
काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे काम पावसाळ्याच्या आत करावं लागणार असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
कोल्हापूरचा दसरा महोत्सव किमान 10 दिवस चालावा यासाठी नियोजन केलं जाणार आहे.कोल्हापुरात या निमित्ताने 10 दिवस चांगलं वातावरण निर्माण होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकार सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर होते.