Home राजकीय थेट तालमीतूनच उपमुख्यमंत्र्यांचा क्रीडा अधिकाऱ्यांना फोन!

थेट तालमीतूनच उपमुख्यमंत्र्यांचा क्रीडा अधिकाऱ्यांना फोन!

0 second read
0
0
39

no images were found

थेट तालमीतूनच उपमुख्यमंत्र्यांचा क्रीडा अधिकाऱ्यांना फोन!

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर येथील प्रशासकीय आढावा बैठकीला खासदार आमदार आणि काही अधिकारीच उशिरा आल्याचे चित्र पहावयास मिळाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालमींना मदत करण्याचे धोरण जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर तालमीचा आढावा घेण्यासाठी ते आज कोल्हापुरातील गंगावेस तालमीला भेट दिली. यादरम्यान अनुपस्थित असलेल्या क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून अजितदादांनी तातडीने त्यांना तालमीत येण्याची सूचना केली. यावेळी अजित पवार म्हणाले, “अहो कुठे आहात तुम्ही अजित बोलतोय, तुम्ही कुठे आहात आता? तालमीत कधी येणार आहे? लवकर शिस्तीत या….” दरम्यान, अजित पवार हे शिस्त आणि वेळेचा काटेकोरपणा, यासाठी ओळखले जातात. नियम न पाळल्यामुळे अजित पवार यांनी बड्या-बड्या अधिकाऱ्यांना फटकारल्याचे किस्से यापूर्वीदेखील चर्चेत आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराराणी सभागृहात बैठक सुरु झाली आहे. दहा वाजता बैठक असताना पाच मिनिटे आधीच अजित पवार आल्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. पोलिसांनी यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. अजित पवार यांनी बैठक सुरू केल्यानंतर खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे या बैठकीसाठी हजर झाले. आज या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, जोतिबा विकास आराखडा यासह पंचगंगा प्रदूषण निर्मूलन आराखड्यावर अधिक चर्चा होण्याची शक्यता असून कदाचित अजित पवार हे कोल्हापूरसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तत्पूर्वी पवार यांनी शासकीय विश्रामगृहावर प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. पवार यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा भरगच्च दौरा असून भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा कृषी प्रदर्शनाचा समारोप त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण असल्याचे दिसून येते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…