रामललाच्या प्राणप्रतिष्ठेवर अखेर पाकिस्तानने गरळ ओकली !
अयोध्येत सोमवारी प्राणप्रतिष्ठेसह 500 वर्षाची प्रतिक्षा संपली. सगळ्या देशाला या क्षणाची उत्सुक्ता लागली होती. अखेर काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूजा-अर्चा पार पडली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर सगळ्या देशात उत्साह आहे. देशभर सेलिब्रेशन सुरु आहे. 22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशात दिवाळी साजरी झाली. आसमंतात जय श्रीरामचा नारा भरुन राहिला होता. सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी झाली. रोषणाईने सर्वकाही उजळून निघालेलं. भारतात घरा-घरात दीप प्रज्वलन झालं. भारताच्या या आनंद पर्वावर पाकिस्तान कसा रिएक्ट होणार? याकडे आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांच लक्ष लागल होतं. जगातील अनेक देशांनी राम मंदिराच्या उद्गाटनाबद्दल भारताला शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानला अपेक्षेप्रमाणे त्रास झाला. पाकिस्तानला पोटदुखी झाली. चांगलाच जळफळाट झाला. भारताबद्दल नेहमीच उलट-सुलट वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानने हिंदुत्वाला सर्वात मोठा धोका म्हटलय.
अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेनंतर पाकिस्तानने त्यांची भूमिका जाहीर केलीय. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर त्यांनी अपेक्षेप्रमाणे टीका केलीय. “प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भारतातील वाढत्या बहुसंख्यवादाचा संकेत आहे. मागच्या 31 वर्षात भारतात ज्या घटना घडल्या, त्यानंतर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा बहुसंख्यवादाचा संकेत आहे. भारतीय मुस्लिमांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टीने पिछाडीवर टाकण्याचा हा एक भाग आहे” असं पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटलं आहे.
“भारतात विस्तारत जाणाऱ्या हिंदुत्वाच्या विचारधारेमुळे धार्मिक सद्भव आणि क्षेत्रीय शांततेला गंभीर धोका आहे” असं पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटलं आहे. पाकिस्तानने धार्मिक आधारावर मुस्लिमांसह अल्पसंख्याक समुदाय आणि त्यांच्या धार्मिक स्थळांची सुरक्षा सुनिश्चित करायला भारताला सांगितलं आहे. पाकिस्तानी वर्तमानपत्रांनी सुद्धा भारताविरोधात गरळच ओकली आहे.
अमेरिकन वर्तमानपत्र वॉल स्ट्रीटने मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला धर्मनिरपेक्ष नितीला निवडणुकीशी जोडलं आहे. वॉल स्ट्रीटने सुद्धा याला निवडणूक प्रचार ठरवलय. ही घटना भारतातील हिंदुंना प्रभावित करेल व भाजपाला पुन्हा एकदा सत्तेत परतण्याची संधी मिळेल असं म्हटलं आहे. नेहरुंच्या धर्मनिरपेक्ष नितीचा सुद्धा उल्लेख आहे. मंदिर हिंदुंना एकजूट करेल की विभाजीत? असा प्रश्नही अखेरीस विचारण्यात आलाय.