Home आरोग्य अपोलो हॉस्पिटल्समध्ये स्वॅप मूत्रपिंड प्रत्यारोपणाने वाचवले दोघांचे प्राण

अपोलो हॉस्पिटल्समध्ये स्वॅप मूत्रपिंड प्रत्यारोपणाने वाचवले दोघांचे प्राण

0 second read
0
0
63

no images were found

अपोलो हॉस्पिटल्समध्ये स्वॅप मूत्रपिंड प्रत्यारोपणाने वाचवले दोघांचे प्राण

 नवी मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना दान केले मूत्रपिंड

नवी मुंबई: नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटल्स हे एक अग्रगण्य दर्जात्मक रुग्णालय आहे, या रुग्णालयाने पहिली स्वॅप मूत्रपिंड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. या स्वॅपमध्ये दोन कुटुंबाचा सहभाग होता, उरणमधील सीथा कुटुंब आणि सायनमधीन सैनी कुटुंब. वैद्यकीय गुंतागुंतीमुळे कुटुंबातील सदस्यांना स्वतःच्या नातेवाईकांना मूत्रपिंड दान करणे अशक्य झाल्यामुळे या दोन कुटुंबाने एकमेकांमध्ये मूत्रपिंडाची अदलाबदल केली. या प्रकरणात राहुल सीथा यांच्या मातोश्री सुनंधा सीथा यांनी गुरुदेव सिंह यांच्या पत्नी परविंदर सिंह यांना मूत्रपिंड दान केले तर गुरुदेव सिंह यांनी राहुल सीथा यांना मूत्रपिंड दान केले.

नेफ्रोलॉजी आणि प्रत्यारोपण चिकित्सकीय सल्लागार डॉ. अमित लंगोटे म्हणाले की, “ज्यांच्याकडे कुटुंबातील दाता आहे परंतु विसंगतीच्या समस्यांमुळे अवयव दान प्राप्त करु शकत नाही अशा मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी स्वॅप प्रत्यारोपण हा एक संभाव्य उपाय आहे. या प्रकरणात, अदलाबदल करुन दोन्ही रुग्णांना अस्वीकृतीच्या कमी जोखमीसह चांगले मूत्रपिंड मिळाले आणि परिणामी दोन्ही कुटुंबियांसाठी ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.”

अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईबद्दल: अपोलो हॉस्पिटल्स हे मुंबई आणि नवी मुंबईच्या विभागातील सर्वात प्रगत बहु-वैशिष्ट्ये असलेले दर्जात्मक सेवा देणाऱ्या रुग्णालयांपैकी एक आहे. हे रुग्णालय एका छताखाली सर्वसमावेशक आणि एकात्मिक उत्कृष्ट वैशिष्ट्य असलेली सेवा प्रदान करते, ज्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय किर्तीचे उच्च अनुभवी डॉक्टर तसेच परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर सहाय्यक कर्मचारी यांचा देखील समावेश आहे. हे रुग्णालय जेसीआयद्वारे मान्यताप्राप्त आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर   कोल्हाप…