
no images were found
दलित वस्ती सुधारणा योजनेतून सिद्धार्थनगर येथील पूरसरंक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ, रु.९५ लाखांचा निधी
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील प्र.क्र.२८ अंतर्गत सिद्धार्थनगर येथे जयंती नदीला सन २०१९ व २०२१ साली आलेल्या महापुराचे पाणी सिद्धार्थनगर मधील नागरी वस्तीत येवून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रापंचिक साहित्याचे, इमारतींचे आर्थिक नुकसान झाले होते. दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्यात सदर भागातील नागरिकांची घरे बाधित होतात. त्यामुळे या पूरग्रस्त भागात पूर संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. याबाबतची मागणी भागातील स्थानिक नागरिकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांना केली होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर प्रत्यक्ष जागेची पाहणी करून निधी मागणी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. शासनाच्या नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून सिद्धार्थनगर पूरसरंक्षक भिंत बांधणे या कामास निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील शरद कामत ते भालदार घरापर्यंत जयंती नदीला पूररक्षक भिंत बांधणे या कामाचा शुभारंभ आज युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला. या कामास रु.९५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांनी निधी मंजूर केल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, अनुसूचित जाती जमाती सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, इंद्रजीत आडगुळे, जगदीश शिरोलीकर, वसंत लिंगनूरकर, महादेव कोल्हे, गणेश गवळी, वसुधा शिर्के, जीवन कांबळे, प्रशांत शिरोलीकर, महावीर पोवार, सुकुमार सोहनी आदी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.