Home मनोरंजन सृती झा : “स्वत:च्या हक्कांसाठी ठामपणे उभी राहणारी व्यक्तिरेखा साकारण्यात मजा येते!”

सृती झा : “स्वत:च्या हक्कांसाठी ठामपणे उभी राहणारी व्यक्तिरेखा साकारण्यात मजा येते!”

12 second read
0
0
19

no images were found

सृती झा : “स्वत:च्या हक्कांसाठी ठामपणे उभी राहणारी व्यक्तिरेखा साकारण्यात मजा येते!”

 

‘झी टीव्ही’ वाहिनीने अलिकडेच प्रसारित केलेली ‘कैसे मुझे तुम मिल गये’ ही मालिका वेगाने प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत चालली आहे. मनाजोगता जीवनसाथी मिळाल्यावर वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते, या तत्त्वावर विश्वास असलेली अमृता (सृती झा) ही मध्यमवर्गीय मराठी मुलगी आणि सर्व मुली या केवळ पैशाच्या मागे असतात, अशी समजूत झाल्याने विवाह या संस्थेवर विश्वास नसलेला विराट (अर्जित तनेजा) या पंजाबी मुलगा यांच्यातील या जवळपास अशक्य वाटणार्‍्या प्रेमकथेचे चित्रण या मालिकेत केले आहे. सशक्त प्रेरणा असलेली आणि आपल्या मनातील गोष्टी व्यक्त करता येणारी अमृताची व्यक्तिरेखा साकारताना लोकप्रिय अभिनेत्री सृती झा हिला आवडत आहे.

अमृताची व्यक्तिरेखा ही आजच्या तरूण पिढीला सहज पटणारी आहे, असे सृती झा हिचे मत आहे याचे कारण अमृता ही आजच्या पिढीतील मुलगी आहे. ती महत्त्वाकांक्षी असली, तरी तिला वास्तव परिस्थितीचे भान आहे. उदाहरणार्थ, मालिकेत अमृताला तिच्या गृहिणी असलेल्या आईची बाजू ठामपणे मांडताना दाखवण्यात आले आहे. नोकरी करून कुटुंबाला आर्थिक मदत करणार्‍्या पतीइतकीच घरात राहून घर सांभाळणारी पत्नीही महत्त्वाची असते, असे ती प्रतिपादन करते. दुसर्‍्या स्त्रीच्या मोहापायी आपल्या आईला सोडून देणार्‍्या आपल्या पित्याला अमृता त्याच्या या चुकीच्या वर्तणुकीचा जाब विचारते आणि यापुढे आपण आपल्या पित्याचे नाव न लावता आपल्या आईचे नाव लावण्याचा निर्णय जाहीर करते. ठराविक वयातच मुलांचे लग्न झाले पाहिजे, असा दबाव मुलांवर कधीच नसतो, पण समाज मुलींचे लग्न मात्र ठराविक वयांमध्येच केले पाहिजे, असा दबाव का आणतो, याबाबत अमृता प्रश्न उपस्थित करताना आगामी भागांमध्ये दिसेल.  आजवर केवळ मवाळ, त्याग करणारी आणि अन्याय व दु:ख सहन करणार्‍्या स्त्रियांच्या ठराविक साच्याची व्यक्तिरेखा उभी करण्याऐवजी आजच्या काळातील टीव्ही मालिकांचे लेखक हे आपल्या हक्कांबाबत जागरूक असलेल्या आणि आपले मत ठामपणे मांडणाऱ्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखा कसा साकारू लागले आहेत, त्याचे दर्शन अमृतासारख्या व्यक्तिरेखेद्वारे घडते.

अनुचित प्रथांविरोधात योग्य पध्दतीने आवाज उठवणार्‍्या तरूण स्त्रीची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळत असल्याबद्दल सृती झा हिला खूपच आनंद होत आहे. अशा व्यक्तिरेखांमुळे प्रेक्षक अंतर्मुख होऊन या जुनाट प्रथांचा पुनर्विचार करतील, असे तिला वाटते. सृती झा म्हणाली, “कैसे मुझे तुम मिल गयेसारख्या उत्कृष्ट मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा मला खरंच खूप आनंद झाला असून यातील अमृता ही आजच्या पिढीचं प्रतिनिधित्त्व करते. तिला स्वत:ची मतं आहेत आणि ती ठामपणे व्यक्त करण्यास ती कचरत नाही. आपल्या हक्कांसाठी खंबीरपणे उभी राहणारी अशी व्यक्तिरेखा साकारताना मला खूप आनंद होत आहे.” कणखर मनाची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाल्यामुळे सृती झा जरी आनंदात असताना, विराटचा घटस्फोट झाला आहे, हे अमृताला कळल्यावर तिला काय वाटते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी खूपच रंजक ठरेल. या अनपेक्षित गौप्यस्फोटानंतर तिची विराटबद्दलची प्रतिमा बदलेल? की एका नव्या मैत्रीचा तो प्रारंभ ठरेल?

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…