Home मनोरंजन ‘आंगन अपनो का’मध्ये पल्लवीचा साखरपुडा सुरू असताना आकाशची जयदेव यांच्याकडे हृदस्पर्शी मागणी

‘आंगन अपनो का’मध्ये पल्लवीचा साखरपुडा सुरू असताना आकाशची जयदेव यांच्याकडे हृदस्पर्शी मागणी

22 second read
0
0
106

no images were found

‘आंगन अपनो का‘मध्ये पल्लवीचा साखरपुडा सुरू असताना आकाशची जयदेव यांच्याकडे हृदस्पर्शी मागणी

सोनी सबवरील ‘आंगन अपनो का‘ही मालिका समर्पित एकल पिता जयदेश शर्मा (महेश ठाकूर) आणि त्यांच्या तीन कन्यांसोबतच्या अतूट नात्याची कहाणी आहे. आपल्या कथानकाच्या बळावर या मालिकेने प्रेक्षकांवर घातलेली मोहिनी कायम आहे. मालिकेच्या अलीकडील भागांत आपण पाहिले की, जयदेश हे पल्लवीचा(आयुषी खुराना)हिचा विवाह सिद्धांतसोबत (ओंकार कपूर) ठरवतात, यामुळे आकाशचा (समर वेरमानी)मात्र चांगलाच हृदयभंग होतो. पल्लवी आणि आकाशच्या नात्याला आकाशची आई झिडकारून लावते. यामुळे पल्लवी सिद्धांतसोबत विवाहास राजी होते.

मालिकेच्या आगामी भागांत आपण पाहणार आहोत की, घटना–घडामोठी एक आश्चर्यकारक वळण घेतात. पल्लवीचा साखरपुड्याचा सोहळा सुरू असतानाच आकाश हा जयदेव यांच्याकडे तिला लग्नाची मागणी घालतो. आकाशची ही अनपेक्षित मागणी आणि कबुली जयदेव तसेच पल्लवीलाही आश्चर्याने स्तब्ध करून टाकते. दरम्यान, आपल्या आईने नापसंती दर्शवल्यामुळेच पल्लवीने सिद्धांतसोबत विवाहाचा निर्णय घेतल्याची माहिती आकाशला कळून चुकते. यापुढे हळूहळू मालिकेचे कथानक उलगडत जाते. पल्लवी आणि आकाशच्या मिलनाचा हा मार्ग खूप वळणे अन् कलाटण्यांनी भरलेला आहे, याची खात्री देतो. हे कथानक या दोघांच्या प्रेमकहाणीत प्रेक्षकांना गुंतवून ठेवेल, यात शंका नाही.

मालिकेत जयदेवची भूमिका साकारणारे अभिनेते महेश ठाकूर म्हणाले की, “आकाशने पल्लवीवरील आपल्या प्रेमाची भावना प्रकट केल्यामुळे जयदेव यांना आश्चर्याचा जोरदार धक्का बसतो. त्यांना या परिस्थितीही जराही कल्पना नसते. आपल्या मुलीने त्याच्या मनातील खऱ्या भावना आपल्यापासून लपवल्या आणि एक शब्दही न उच्चारता तिच्या प्रेमाचा त्याग करण्यासाठी ती सज्ज झाली ही बाब त्यांना सतावते. या प्रकरणात आपलीच चूक असल्याचे ते मान्य करतात. जयदेव आपल्या चुकीची कशा प्रकारे दुरुस्ती करतील, हे पाहणे प्रेक्षकांसाठी मोठ्या औत्सुक्याचे ठरणार आहे.”

मालिकेत आकाशची भूमिका साकारणारा अभिनेता समर वेरवानगी म्हणाला की,“आपल्या डोळ्यांसमोरच आपल्या आयुष्यातील प्रेम हे दुसऱ्याच कुणाशी साखरपुडा करत असल्याचे पाहून आकाश स्वत:ला एका असहाय स्थितीत घेरल्या गेल्याचे अनुभवतो आहे. एका आगळ्यावेगळ्या दृष्टिकोनचा अवलंब करत तो पल्लवीऐवजी जयदेव यांच्याकडे मागणी घालतो आहे. पल्लवीसोबत हा त्याच्या पुर्नमिलनाच्या शेवटच्या प्रयत्नांपैकी एक प्रयत्न आहे. शर्मा कुटुंब या आगळ्यावेगळ्या प्रस्तावावर आणि धक्कादायक खुलाशावर कशी प्रतिक्रिया देते हे आपल्याला मालिकेच्या आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. पुढील भाग हे प्रेक्षकांची मती गुंगवून टाकणारे असतील, याचा मला पूर्णपणे आत्मविश्वास वाटतो.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आरटीआय कायद्याचे अस्तित्व धोक्यात; ॲड. असीम सरोदे यांचे कोल्हापुरात व्याख्यान

आरटीआय कायद्याचे अस्तित्व धोक्यात; ॲड. असीम सरोदे यांचे कोल्हापुरात व्याख्यान कोल्हापूर (प…