Home चर्चासत्र आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावर शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषद

आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावर शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषद

8 second read
0
0
19

no images were found

‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावर शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषद

कोल्हापूर, (प्रतिनिधी):शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातर्फे येत्या शनिवारी (दि. १४) ‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. झेक रिपल्बिक येथील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. इंद्रजीत घोष यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार असून प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती अधिविभाग प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनी दिली आहे.

        डॉ. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या रँकिंग फ्रेमवर्कमध्ये आघाडीचे स्थान प्राप्त केलेला रसायनशास्त्र अधिविभाग डीएसटी-फिस्ट आणि युजीसी-सॅप योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त आहे. ए.एन.आर.एफ.-पेअर उपक्रम आणि भारत सरकारच्या खनिकर्म मंत्रालयातर्फेही मान्यताप्राप्त आहे. अधिविभागातर्फे आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनशास्त्रावर आधारित उपायांद्वारे शाश्वत विकास, ऊर्जा आणि पर्यावरणातील जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अभिनव आणि उदयोन्मुख कल्पनांच्या देवाणघेवाणीच्या अनुषंगाने विचारमंथन करण्यात येणार आहे. परिषदेत स्ट्रक्चरल इनऑर्गेनिक, ऑर्गेनो-मेटॅलिक आणि मटेरीयल्समधील अत्याधुनिक संशोधनावर प्रकाश टाकण्यात येईल. उत्प्रेरक हरित रसायनशास्त्र आणि आयोनिक द्रव पदार्थांच्या निर्मितीच्या अनुषंगानेही चर्चा होईल. फोटो कॅटॅलिस्ट आणि हायड्रोजन संबधित प्रक्रियासह उर्जा साठवणूक आणि उर्जा रूपांतरण तंत्रज्ञानानातील नवकल्पनांबाबतही संशोधन निबंध सादर केले जातील. परिषदेत सुमारे ३५० पेक्षा अधिक देशविदेशांतील संशोधक, शिक्षक, विद्यार्थी सहभागी होणार असून दोनशेहून अधिक शोधनिबंध सादर करण्यात येतील.

        परिषदेत प्रा. ग्यानविटो विले (इटली), प्रा. जगदीश राजेनहळ्ळी (जर्मनी), डॉ. सचिन नानावटी (इंग्लंड), प्रा. अनंत कापडी, आयसीटी, मुंबई, डॉ. दिनेश सावंत, एनसीएल, पुणे, प्रा. व्यंकट कृष्णन, आयआयटी, मंडी आदी नामवंत शास्त्रज्ञ परिषदेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेचे समन्वयक म्हणून डॉ. संजय कोळेकर काम पाहात असून प्रा. हंगीर्गेकर, प्रा. राशिनकर हे विविध समित्यांचे प्रमुख आहेत. परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. कल्याणराव गरडकर आहेत. डॉ. सपताळ, डॉ. दगडे, डॉ. संकपाळ यांच्यासह कार्यकारिणी परिश्रम घेत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In चर्चासत्र
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…