no images were found
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची बैठक संपन्न
कोल्हापूर: केंद्र शासनाची प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही महत्वकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समितीची बैठक दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष राहुल रेखावार व जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह अध्यक्ष संतोष पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.
बैठकीत श्रीकांत जौंजाळ जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी या योजनेबाबत सविस्तर माहिती देवून प्रस्तावना केली. तसेच तीन अशासकीय सदस्यांचा सत्कार समिती अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला. पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान कौशल्य विकास योजनेच्या माहितीबाबत उपस्थितांना व्हीडीओव्दारे सादरीकरण करुन योजनेच्या आज अखेरील सद्यस्थितीची माहिती सांगितली.
पोर्टलच्या सविस्तर माहितीसाठी जीवन शिंदे, सीएससी सेंटर व श्री. एन. एच पाटील, पर्यवेक्षक उद्योग यांनी योजनेच्या पोर्टलची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. अध्यक्षांनी प्रस्ताव मंजुरी बाबत पूर्ण माहीती घेतली.
बैठकीस सर्व समिती सदस्य, सीएससी सेंटरचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीमध्ये योजनेच्या अमंलबजावणीसाठी येणाऱ्या अडी-अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा समितीकडे प्राप्त असलेले प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी तातडीने पाठविण्याबाबत समिती अध्यक्षांनी सुचित केले. बैठकीस जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तसेच सीएससी सेंटरचे नितीन मोहिते, संदीप पाटील व जिल्हा कार्यालयाचे अनिल पोतदार प्र. लेखापरिक्षक, श्री. एन.एच. पाटील, पर्यवेक्षक उद्योग, श्री.डी. आर. वाडेकर मध पर्यवेक्षक उपस्थित होते.