
no images were found
ऑनलाइन एम.बी.ए.अभ्यासक्रम प्रवेशाकरिता पूर्वनावनोंदणीसाठी आवाहन
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्यावतीने पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबर ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत.त्यामध्ये ऑनलाइन एम.बी.ए.अभ्यासक्रम लवकरच सुरु करण्यात येत असल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनीं दिली.
विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या वतीने ऑनलाइन एम.बी.ए.अभ्यासक्रम सुरु करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. हा अभ्यासक्रम प्रवेश, अध्ययन, परीक्षा व निकाला पर्यंत असणारी सर्व शैक्षणिक प्रक्रिया ऑनलाइन स्वरुपाची असणार आहे. ऑनलाइन एम.बी.ए.अभ्यासक्रमाची पदवी इतर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या समकक्ष आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकष एकचा दर्जा असणारे शिवाजी विद्यापीठ ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु करून बदलत्या जगातील आव्हानांना विद्यार्थी समर्थपणे समोर जावा. याकरिता एक ऐतिहासिक पाऊल टाकत आहे. आता घर बसल्या मोबाईल, संगणकच्याद्वारे जागतिक दर्जाचा ऑनलाइन एम.बी.ए.अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्णसंधी दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र इच्छुकांना देत आहे.
सुसज्ज अशा लर्निंग म्यानेजमेंट सिस्टीमद्वारे विषय तज्ञांनी विकसित व्हीडीओ लेक्चर्स, इ – बुक्स लाईव्ह कॉन्सालिंगसेशन, डिस्कशन फोरम, प्रक्टीस टेस्टच्या माध्यमातून
संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळणार आहे. तरी इच्छुकांनी प्रवेश प्रक्रींया सुरु होण्यापूर्वी http://rb.gy/znonxg या लिंकला जावून पूर्व नाव नोंदणी करावी. असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले आहे.