
no images were found
लघुपट स्पर्धेतील यशाबद्दल शहा बंधूंचा विद्यापीठात सत्कार
कोल्हापूर( प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन संचलित शॉर्टफिल्म मेकिंग कोर्सचे विद्यार्थी प्रेषित शहा आणि पार्षद शहा यांच्या ‘प्लास्टिक ब्लॉक’ या शॉर्टफिल्मला गार्डन क्लबच्या वतीने आयोजित फेस्टीव्हलमध्ये दुसरा क्रमांक मिळाला. याबद्दल शहा बंधूंचा पत्रकारिता अध्यासनात सत्कार करण्यात आला.
गार्डन क्लबच्या वतीने अलिकडेच पर्यावरण या विषयावर शॉर्ट फिल्म फेस्टीव्हल आयोजित केला होता. या फेस्टिव्हलमध्ये अनेक शॉर्टफिल्मचे स्क्रीनिंग झाले. त्यात प्रेषित शहा आणि पार्षद शहा यांच्या र्शार्टफिल्मला परीक्षकांनी दुसरा क्रमांक दिला. टाकावू तसेच विघटन न होणार्या प्लास्टिकपासून रस्ते तसेच पार्किंगसाठी आवश्यक असणारे पेव्हिंग ब्लॉक कसे तयार करता येऊ शकतात, हा शहा बंधूंच्या शॉर्टफिल्मचा विषय होता. प्रेषित शहा यांनी या फिल्मचे दिग्दर्शन केले आहे तर पार्षद शहा यांनी संकलन आणि संशोधन केले आहे.
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात सन 2023 मध्ये सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची एक बॅच नुकतीच बाहेर पडली आहे. पहिल्या बॅचचे विद्यार्थी असलेल्या शहा बंधूंच्या शॉर्टफिल्मला मिळालेले बक्षीस विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचे फलित आहे, अशी प्रतिक्रिया अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी व्यक्त केली. शहा बंधूंना सहयोगी शिक्षक विराज चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी डॉ. शिवाजी जाधव, लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर, फ्रीलान्स फोटोग्राफर अभिजित गुर्जर, शॉर्ट फिल्म निर्माता जयसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.
फोटो ओळी ः
कोल्हापूर ः पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे विद्यार्थी प्रेषित शहा आणि पार्षद शहा यांचा सत्कार करताना विराज चव्हाण. (डावीकडून) अनुप जत्राटकर, डॉ. शिवाजी जाधव, अभिजित गुर्जर, जयसिंग चव्हाण आदी.