Home शासकीय बालविवाह आणि बेपत्ता महिला प्रकरणे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

बालविवाह आणि बेपत्ता महिला प्रकरणे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

6 second read
0
0
27

no images were found

बालविवाह आणि बेपत्ता महिला प्रकरणे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

 

कोल्हापूर : बालविवाह तसेच मुली व महिला बेपत्ता होण्याची बाब चिंताजनक असून अशी प्रकरणे रोखण्यासाठी सर्व विभागांनी संयुक्तरित्या प्रयत्न करुन ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केल्या.

    ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत सुनावणी झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ होवू नये, यासाठी शासकीय कार्यालये तसेच सर्व खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार निवारण समित्यांची स्थापना केल्याची खात्री करा. अशी समिती स्थापन न केलेल्या आस्थापनांवर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

बालविवाह आणि महिला बेपत्ता होण्याची प्रकरणे हे राज्यासमोरील गंभीर प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाज मंदिर अथवा धार्मिक स्थळांमध्ये बालविवाह झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांना जबाबदार धरुन त्यांच्यावरही कडक कारवाई करावी. त्याचबरोबर बालविवाहाची माहिती देण्यासाठी अधिकाधिक  नागरिक पुढे यावेत, यासाठी अशी माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवा. त्याचबरोबर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकांमध्ये व्यापक जनजागृती करावी. जेणेकरुन कोणत्याही आमिषाला बळी पडून मुली व महिला बेपत्ता होवू नयेत, यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

मनोधैर्य योजनेंतर्गत पीडित महिलांना आर्थिक मदत मिळवून द्या. घरगुती कामगारांसाठी घरेलू कामगार मंडळांमार्फत लाभार्थी महिलांना लाभ मिळवून द्या. सर्व कार्यालयांमध्ये महिला स्वच्छतागृह असल्याची तसेच औद्योगिक क्षेत्रात महिलांना प्रसूती लाभ तसेच समान काम समान वेतन दिले जात असल्याची खात्री करा. महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी दाखल करुन घेऊन योग्य तपास करा, जेणेकरुन दोषींवर जलद कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यात अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीला पोलीस विभागाने जलद न्याय मिळवून दिल्याबद्दल तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व पोलीस विभागाचे श्रीमती चाकणकर यांनी कौतुक केले. त्याचबरोबर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत अवैधरित्या गर्भलिंग तपासणी करणारे रॅकेट पकडल्याबद्दल आरोग्य विभागाचे त्यांनी कौतुक केले. यापुढेही पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत धाडसत्र वाढवून बोगस डॉक्टरांवर व दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विधवा प्रथा बंदी करणाऱ्या हेरवाड ग्रामपंचायतीचे कौतुक करुन राज्यातील अन्य ग्रामपंचायतींनी या उपक्रमाचे अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने विधवा महिलांना मसाले बनवण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमाचे तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पन्हाळा व शाहूवाडी या डोंगराळ व दुर्गम तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या ‘नन्ही कली’ उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.

 यावेळी महिला व बालविकास विभाग, कोल्हापूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, शिक्षण, परिवहन, कौशल्य विकास आदी विभागाशी संबंधित महिलांच्या प्रश्नांचा आढावा त्यांनी घेतला. निराश्रित महिला, किशोरवयीन माता, अत्याचारित महिला, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी शासकीय वसतीगृहे, वन स्टॉप सेंटरची सद्यस्थिती, महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे, महिलांचा कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, शासकीय, खाजगी कार्यालये, बसस्थानक येथील स्वच्छतागृहे, महिलांचे आरोग्य व अन्य प्रश्नांचा आढावा त्यांनी घेतला.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बालविवाह व अवैध गर्भलिंग तपासणी रोखण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस विभागाकडे प्राप्त महिला तक्रारी व सद्यस्थिती ची माहिती दिली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने मुली व महिला विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागांची माहिती यावेळी सादर केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…