Home शासकीय शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी

शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी

30 second read
0
0
39

no images were found

 

 

शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी

 

 

कोल्हापूर, :-राज्य शासन दिनांक 15 एप्रिल 2023 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहे. त्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 11 जून 2023 रोजी तपोवन मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात येत असून जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत कार्यक्षमपणे पूर्ण करावी असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयातून आलेले जनकल्याण कक्षाचे समन्वयक तथा मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांनी केले.

             जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात अधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी सतीश जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कामत, रवींद्र माने यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

         जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत 1 जून 2023 पासून नवीन 75 हजार लाभार्थी यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभाग प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आलेली असून प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांना विशिष्ट जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

         प्रत्येक विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी शोधून त्यांना आवश्यक असलेल्या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. 11 जून रोजी तपोवन मैदानावर होणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन सज्ज असून हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरेल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी व्यक्त केली.

           राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्याचा महा संकल्प करण्यात आलेला असून यातून शासन प्रशासन हे सामान्य लोकांसाठी कार्यरत असून अधिक गतीने काम करत असल्याचे कृतीतून दिसले पाहिजे यासाठी हा उपक्रम असल्याची माहिती या उपक्रमाचे राज्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी दिली.

         कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे काम चांगले आहे. प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासनात काम करत असताना फक्त कर्तव्य म्हणून काम न करता सर्वसामान्य लोकांसाठी आपल्या विभागाचा योजनांचा लाभ मिळवून देऊन त्या लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर समाधान आले पाहिजे यासाठी प्रयत्न करावा त्यासाठी प्रत्येकाने सेवाभाव वृत्तीने काम केल्यास शासन विविध लोक कल्याणकारी योजना राबवत असते त्याची खऱ्या अर्थाने अमलबजावणी होणे शक्य होईल असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.

          कार्यक्रमाच्या दिवशी लाभार्थ्याची ने -आण करणे व लाभार्थ्यांना नाश्तापाणी, ओ आर एस पॉकेट देणे तसेच कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या रिटर्न फूडची व्यवस्था याबाबतचे सूक्ष्म नियोजन झाले पाहिजे, असे मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांनी सांगितले. प्रवासात व कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्यवस्था नियोजन नीटनेटके असावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी साहित्य वाटप लाभार्थ्यांची यादी व त्यांच्या पासची व्यवस्था करावी व लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.

          यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शासन आपल्या दारी उपक्रमासाठी नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांचा व त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारी बाबत सविस्तर आढावा घेऊन दिलेले जबाबदारी चोखपणे पार पाडणे व अन्य अनुषंगिक बाबी बाबत मार्गदर्शन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…