no images were found
आयआयएफएल फायनान्स रोख्यांवर ९ टक्के पर्यंत व्याज देणार
मुंबई, : भारतातील सर्वात मोठ्या बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेली आयआयएफएल फायनान्स तिच्या रोख्यांवर (बॉंड्स) उच्च दर्जाच्या सुरक्षिततेसह ९ टक्के पर्यंत व्याज प्रदान करत आहे. या रोख्यांची सार्वजनिक विक्री ९ जून २०२३ रोजी सुरु झाली असून, त्यातून व्यवसाय आणि भांडवल वाढीसाठी १५०० कोटी रुपये उभारले जाणार आहेत. ही रोखे विक्री मागणीनुसार २२ जून किंवा त्याआधी बंद होईल.
आयआयएफएल फायनान्स एकूण ३०० कोटीं रुपयांचे सुरक्षित रिडीम करण्यायोग्य नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (एनसीडी) रु.१२०० कोटींपर्यंतचे (एकूण रु.१,५०० कोटी) ओव्हर-सबस्क्रिप्शन राखून ठेवण्यासाठी ग्रीन-शू पर्यायासह जारी करेल.
आयआयएफएल रोखे ६० महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिवर्षी ९ टक्के चा सर्वाधिक प्रभावी परतावा प्रदान करतात. हे अपरिवर्तनीय रोखे (एनसीडी) २४ महिने, ३६ महिने आणि ६० महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत. व्याज पेमेंटची फ्रिक्वेन्सी वार्षिक, मॅच्युरिटी आधारावर आणि ६० महिन्यांच्या कालावधीसाठी मासिक पर्यायासह उपलब्ध आहे.क्रिसिल रेटींग्सद्वारे एए / स्थिर आणि आयसीआरएद्वारे ए ए / स्थिर क्रेडिट रेटिंग देण्यात आली आहे, जे सूचित करते की, आर्थिक जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्यासाठी ही वित्तीय साधने उच्च दर्जाची सुरक्षित असल्याचे आणि खूप कमी क्रेडिट जोखीम बाळगत असल्याची मानली जातात आणि. २०२२- २३ या आर्थिक वर्षाच्या ४थ्या तिमाहीत मूडीजने आयआयएफएल फायनान्सची रेटिंग श्रेणी सुधारत बी२ वरून बी१ (स्थिर) केली आहे.
आयआयएफएल फायनान्सचे ग्रुप सीएफओ कपिश जैन म्हणाले, आयआयएफएल फायनान्स तिच्या भारतभरातील ४००० हून अधिक शाखांच्या मजबूत भौतिक उपस्थितीद्वारे आणि विविध रिटेल पोर्टफोलिओद्वारे कमी सेवा उपलब्ध असलेल्या लोकसंख्येच्या क्रेडीट गरजा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे. रोख्यांच्या विक्रीतून जमा होणारा निधी अशा अनेक ग्राहकांच्या क्रेडिट गरजा पूर्ण करण्यासाठी आणि अडथळेरहीत अनुभव प्रदान करण्याकरीता आमच्या डिजिटल प्रक्रियेच्या परिवर्तनाला गती देण्यासाठी वापरला जाईल.
२०२२ -२३ या आर्थिक वर्षात आयआयएफएल फायनान्सने १६०७.५ कोटी रुपयांचा करानंतरचा नफा (प्रॉफीट आफ्टर टॅक्स) नोंदवला आहे, जो १९.९ टक्के च्या इक्विटीवर मजबूत परतावा देऊन मागील वर्षाच्या तुलनेत ३५ टक्के जास्त आहे. तिचे अनेक बँका आणि वित्तीय संस्थांशी चांगले मजबूत संबंध आहेत.या रोखे विक्रीचे प्रमुख व्यवस्थापक एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत. गुंतवणूकदारांना तरलता प्रदान करण्यासाठी संबंधित अपरिवर्तनीय रोखे (एनसीडी) बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड वर (एनएसई) सूचीबद्ध केले जातील. आयआयएफएल रोखे रु.१००० च्या दर्शनी मूल्यावर जारी केले जातील आणि सर्व कॅटेगरींमध्ये अर्जाचा किमान आकार रु. १०,००० इतका असेल. सार्वजनिक विक्री ९ जून २०२३ रोजी सुरु होईल आणि लवकर बंद करण्याच्या पर्यायासह २२ जून २०२३ रोजी बंद होईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर रोख्यांचे वाटप केले जाईल.