Home शैक्षणिक अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत हॉटेल सयाजी येथे मंगळवारी सेमिनार

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत हॉटेल सयाजी येथे मंगळवारी सेमिनार

2 second read
0
0
28

no images were found

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत हॉटेल सयाजी येथे मंगळवारी सेमिनार

कोल्हापूर/प्रतिनिधी
कसबा बावडा येथील डी. वाय. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने (स्वायत्त संस्था) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ बाबत मंगळवार दि. १३ रोजी हॉटेल सयाजी येथे मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता व महाराष्ट्र राज्य सीईटी सेलचे प्रवेश प्रक्रिया तज्ञ कुणाल वाय. पाटील हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
गेल्या ३९ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ख्यातनाम आहे. उच्च शैक्षणिक परंपरेच्या या संस्थेला २०२१ मध्ये स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्याचबरोबर नॅक ‘अ’ श्रेणी व एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर काही दिवसापूर्वीच ‘नवभारत’ गृपच्या वतीने ‘बेस्ट ऑटोनॉमस इंस्टीटयूट’ म्हणून महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला आहे.
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती मिळावी व उत्तम अभियंता बनण्याचे स्वप्न सुकर व्हावे या हेतूने सामजिक जबाबदारीतून डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय गेली १० वर्षे या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करत आहे. या सेमिनारला दरवर्षी सुमारे १२०० हून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती असते.
या सेमिनारमध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची सध्यस्थिती, अभियांत्रिकीमधील भविष्यातील ट्रेंड, अभियांत्रिकीनंतरच्या विविध करिअरच्या संधी, आरक्षण व जागा वाटप, सरकारकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिप, एमएचटी- सीईटी २०२३च्या निकालाचे विश्लेषण आणि संभाव्य मेरीट लिस्ट नंबर, राज्यातील टॉप कॉलेजीसचा कट ऑफ, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक व आवश्यक कागदपत्रे, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ मधील महत्वाचे बदल, कॉलेजला महत्व द्यावे कि शाखेला याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले जाणार असून अभियांत्रिकीमधील उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी- पालकांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे व अॅडमिशन सेलचे प्रमुख प्रा. रविंद्र बेन्नी यांनी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…