
no images were found
रात्री बिछान्यावर झोपलेल्या दोन भावांचा रात्री सर्पदंशाने मृत्यू
भंडारा : घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली. या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली आहे. सुशील बलवीर डोंगरे (वय 8 वर्ष) व उत्कर्ष बलवीर डोंगरे (वय 11 वर्ष) अशी मृत भावंडाची नावे आहे.
हे दोन्ही भाऊ रात्री एकाच बिछान्यावर झोपी गेले होते. मात्र, रात्री मागच्या दारातून साप आत आला आणि तो बिछान्यावर चढला असता त्या सापाने दोघाही भावांना दंश केला. यावेळी काहीतरी चावल्याचा भास झाला. मात्र, साप चावल्याचे माहित होताच दोघाही भावांना उपचारासाठी आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.
मात्र, भंडारा येथे उपचारादरम्यान भाऊ उत्कर्ष बलवीर डोंगरे याचा रात्री मृत्यू झाला. तर भंडारा येथून दुसरा भाऊ सुशील बलवीर डोंगरे याला भंडारा येथून रात्रीच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देव्हाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे. मृत्यू कधी, कुठे कुणाला कसा येईल, काही सांगता येत नाही. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.