Home सामाजिक छत्रपती शिवरायांवरील महानाट्य ‘शिवगर्जना’चे कोल्हापुरात आयोजन –  हसन मुश्रीफ

छत्रपती शिवरायांवरील महानाट्य ‘शिवगर्जना’चे कोल्हापुरात आयोजन –  हसन मुश्रीफ

10 second read
0
0
32

no images were found

छत्रपती शिवरायांवरील महानाट्य ‘शिवगर्जना’चे कोल्हापुरात आयोजन –  हसन मुश्रीफ

 

         कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 13, 14 व 15 जानेवारी 2024 रोजी या महानाट्याचे आयोजन शहरात गांधी मैदान येथे केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करुन देण्यासाठी 3 प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होणार आहेत. हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे. किमान दहा हजार शिवप्रेमींसाठी या महानाट्याचे नियोजन केले जाणार आहे. हे महानाट्य पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

         हे महानाट्य कोल्हापुरातील भूमिपुत्रांचे असून आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत 85 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही हे महानाट्य सादर झाले आहे. या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदिपक आतिषबाजीही असणार आहे, तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे. 12 व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत  आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…