no images were found
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत शहर स्तरीय कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महत्त्वाकांक्षी अभियानाची शहरस्तरीय कार्यशाळा शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघ हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेस शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाचे 214 मुख्याध्यापक तसेच केंद्र समन्वयक उपस्थित होते.
प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी या अभियानाची इत्यंभूत माहिती दिली. शाळा मधूनच निकोप स्पर्धा होऊन शाळांची शैक्षणिक बहुत बहुतेक प्रगती विद्यार्थी विकास व गुणवत्ता पूर्ण शिक्षण या बाबी वाढीस लागणार आहेत यासाठी राज्य शासनाने हा महत्त्वाकांक्षी अभियान दि.1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी भक्कम बक्षीस योजना ही जाहीर केली आहे. अ वर्ग महानगरपालिकाचा एक गट व उर्वरित शहरे व ग्रामीण भागासाठी एक गट अशा गटांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये यशस्वी शाळांचे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभागस्तरीय क्रमांक काढले जाणार असून तालुकास्तरीय प्रथम 3 क्रमांकासाठी अनुक्रमे 3 लक्ष दोन 2 व 1 लक्ष तर जिल्हास्तरीय यशस्वी शाळा करिता अनुक्रमे 11 लक्ष 5 लक्ष व 3 लक्ष तर विभाग स्तरासाठी 21 लक्ष 11 लक्ष व 7 लक्ष अशी भव्य बक्षीस योजना असणार आहे. या स्पर्धेसाठी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळा सज्ज असून त्या दृष्टीने शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन ही प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी केले.
केंद्र शासनाच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स या महत्त्वाच्या व राज्याचा शैक्षणिक निर्देशांक निश्चित करणाऱ्या निकषाबाबत सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ऑनलाइन माहिती भरणे किती आवश्यक आहे याचे महत्त्व मुख्याध्यापकांना विशद केले. एमआयएस कोर्ट मॅटर नचिकेत सरनाईक यांनी यु-डायस बाबत प्रत्यक्ष प्रोजेक्टर द्वारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रकल्प अधिकारी रसूल पाटील यांनी केले. या कार्यशाळेस जिल्हा परिषद माध्यमिकच्या विस्तार अधिकारी श्रीमती दबडे, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी चव्हाण सर, जगदीश ठोंबरे, शांताराम सुतार आदी उपस्थित होते.