no images were found
ध्रुव आणि सूर्यप्रताप यांना माहीत पडते धक्कादायक सत्य
सोनी सबवरील ‘ध्रुव तारा – समय सदी से परे’ ही मालिका प्रेम आणि कालयात्रेची एक राेचक कथा आहे. ध्रुवच्या भूमिकेत इशान धवन, तर ताराच्या भूमिकेतील रिया शर्माच्या अत्युकृष्ट सादरीकरणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरलेली आहे. यासोबत राजमाता दुर्गावतीच्या भूमिकेतील इंदिरा कृष्णन तर सूर्यप्रताप सिंहच्या व्यक्तिरेखेतील करन व्ही. ग्रोव्हर यांच्या समावेशामुळे मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलेले आहे. मालिकेच्या अलीकडील भागांत आपण पाहिले की, ताराने जीवापाड जपलेली दोन रहस्ये शोधून काढण्याच्या दिशेने सूर्यप्रताप आणि ध्रुव आणखीच जवळ आले आहेत. यामुळे मालिकेतील नाट्याने कळस गाठला आहे.
मालिकेच्या आगामी भागांत आपण पाहणार आहोत की, ताराचा मुलगा शौर्यबाबत (इव्हान दीक्षित) ध्रुव सत्य शोधून काढतो. इतकेच नव्हे तर आपणच त्याचे जैविक पिता आहोत, हेही ध्रुवला कळून चुकते. यातून भावभावनांचा कळस गाठला जातो. हे सुरू असतानाच सूर्यप्रताप ताराचा भूतकाळ खोदून काढतात. ध्रुव हाच तिचा पहिला पती असल्याचे सत्य त्यांना माहीत पडते. या रहस्योद्घाटनामुळे प्रेम आणि कुटुंबासाठी घनघोर संग्रामला तोंड फुटते. परिणामी ताराच्या आयुष्यात गोंधळाचे तुफान वारे घोंगावू लागतात. ध्रुव, तारा आणि सूर्यप्रताप हे या अतिक्षुब्ध टप्प्यातून मार्ग काढतात. कथेचा उलगडा होत असताना कसा पराकोटीचा संघर्ष उद्भवतो, मनाची घट्ट पकड घेणारी कोणती वळणे निर्माण होतात, याची प्रेक्षक अपेक्षा करू शकतात.
मालिकेत ध्रुवची मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता इशान धवन म्हणाला, “तार्किकतेचा आवाज आणि अनागोंदीतही शांततेच्या स्वरूपात प्रेक्षक ध्रुवला ओळखतात. मात्र आता ते त्याची उग्र आणि अधिकाराची बाजू अनुभवताना दिसतील. आता गमावण्यासाठी काहीही शिल्लक उरलेले नाही, आणि त्याने या आधीच ताराला गमावलेले आहे. त्यातच तो शौर्यचा पिता असल्याचे लपवून ठेवले गेल्यामुळे ज्यावर आपला हक्क आहे ते मिळवण्याचा ध्रुवने दृढनिश्चय केला आहे. ध्रुवनुसार, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक वाईट गोष्टींमागे सूर्यप्रताप हीच व्यक्ती आहे. यामुळे आता या दोन्ही पुरुषांत घनघोर रणसंग्रामाची परिस्थिती निर्माण झाली आहे.”
मालिकेत सूर्यप्रतापची भूमिका निभावणारा अभिनेता करन व्ही. ग्रोव्हर म्हणाला की, “ध्रुव हाच ताराचा पती आहे, अन् आजही त्याच्यावर आपले प्रेम आहे, हे सत्य समोर आल्यानंतर सूर्यप्रतापला मोठा धक्काच बसतो. तारावरील त्याच्या अतूट विश्वासाचा चक्काचूर होतो. इतकेच नव्हे तर त्याचा हृदयभंग झाल्याचेही स्पष्टपणे दिसून येते. तारा आणि शौर्यमध्ये निवडलेले कुटुंब आता आपल्याला गमावावे लागणार आहे, याची जाणीव त्याला होते. ध्रुव हे सर्वकाही आपल्यापासून हिरावून घेणार असल्याने त्याला रोखण्यासाठी कुठलीही पावले उचलण्याच्या उद्देशाने सूर्यप्रताप सज्ज होतो. मालिकेचे आगामी कथानक नाट्यमय आणि भावनिक अशा दोन्ही प्रकारच्या वळणावर जाणार आहे. या तीव्र संघर्षावर प्रेक्षक काय प्रतिक्रिया देतात हे जाणून घेण्यासाठी मी खूप आतूर झालेलो आहे.”