Home सामाजिक राम मंदिरातल्या मूर्तीविषयी रामायणातल्या सीतेची मोदींना महत्त्वाची विनंती

राम मंदिरातल्या मूर्तीविषयी रामायणातल्या सीतेची मोदींना महत्त्वाची विनंती

0 second read
0
0
33

no images were found

राम मंदिरातल्या मूर्तीविषयी रामायणातल्या सीतेची मोदींना महत्त्वाची विनंती

रामायण या मालिकेत सीता हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणजे दीपिका चिखलिया. सीतेचं पात्र त्यांनी आपल्या भूमिकेतून अजरामर केलं आहे. आजही सीता म्हटलं की त्यांचाच चेहरा डोळ्यांसमोर येतो. त्यांना विशेष अतिथी म्हणून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात निमंत्रण देण्यात आलं आहे. यावेळी राम मंदिराच्या अनुषंगाने दीपिका चिखलिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खास विनंती केली आहे.
२२ जानेवारी हा दिवस ऐतिहासिक आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ५०० वर्षांनी प्रभूरामचंद्र अयोध्येत येत आहेत. आपल्या घरी येत आहेत. मी राममयी झाले आहे. माझी प्रभू रामचंद्रांवर प्रचंड श्रद्धा आहे. मी सीतेची भूमिका केली यासाठी स्वतःला भाग्यवान समजते. माझ्यासाठी २२ जानेवारीचा दिवस ऐतिहासिक आहे आणि भावनिक करणाराही आहे. सगळ्या भारतीयांसाठी तो गौरवाचा क्षण असणार आहे असं दीपिका चिखलिया यांनी म्हटलं आहे.

Load More Related Articles

Check Also

डेटॉल फ्रेश भारतीयांना 12 तास ताजेपणा देऊन ‘नेहमीच तयार’ रहाण्यासाठी देते प्रोत्साहन

डेटॉल फ्रेश भारतीयांना 12 तास ताजेपणा देऊन ‘नेहमीच तयार’ रहाण्यासाठी देते प्रोत्साहन  …