Home राजकीय महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला

महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला

0 second read
0
0
109

no images were found

महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला

मुंबई  :देशातील सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने बैठकीचा धडका लावला आहे. त्याचबरोबर निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रणनीती देखील आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. महायुतीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तीन मोठे पक्ष आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) असे तीन प्रमुख पक्ष आहेत.
प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. या जागांचे वाटप करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी फॉर्म्युला ठरवला आहे.
महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागांचं वाटप करण्यासाठीचा फॉर्म्युला दिल्लीत ठरला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या फॉर्म्युल्यानुसार, काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला १७ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाला ६ जागा आणि वंचित बहुजन आघाडी २ जागा, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळणार, असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाटाघाटीची सुरुवात २२ ते २३ जागांपासून होऊ शकते. चर्चेअंती दोन्ही पक्ष किमान तीन जागांवर पाणी सोडण्यासही तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून बैठकांचे सत्र सुरू असतानाच महायुतीकडूनही आढावा बैठका सुरू आहेत. राज्यात भाजप लोकसभेच्या २६ जागा, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळून २२ जागा देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. मात्र, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …