no images were found
काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरेंचा भाजपविरोधात मोठा प्लान
आगामी लोकसभा जागावाटपाबाबत काँग्रेस हायकमांड अंतिम निर्णय घेईल, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय. शिवसेनेच्या 23 जागांच्या मागणीबाबत विचारणा केली असता, गुणवत्तेच्या आधारावर जागावाटप होईल, अशी सावध भूमिका पटोलेंनी मांडली.
उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. फोनवरून ही चर्चा झाल्याचं समजतंय. लोकसभेच्या जागावाटपावरून मतभेद होऊ नयेत यासाठी दोन्ही बाजुकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपविरोधात एकत्रित लढायचं असून जागावाटपापेक्षा भाजपला पराभूत करणं हे महत्वाचं आहे असा सूर या चर्चेत असल्याचं समजतंय. पुढील काही दिवसात जागा वाटपासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिल्ली दौरा करण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिलीय. तसंच इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका असेल असंही सुप्रिया सुळेंनी जाहीर केलंय. लोकसभेच्या निवडणुका 30 एप्रिलच्या आत होतील, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. जागावाटप सुरळीत होईल, असंही ठाकरेंनी म्हटलंय. तसंच वंचितबद्दल लवकरच बैठक घेऊन ठरवणार असल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलं.
लोकसभेच्या 23 जागा लढवण्यावर ठाकरे गट ठाम देशात इंडिया आघाडीत रुसवेफुसवे सुरु आहेत तर राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये जागावाटपावरुन तिढा निर्माण झाल्याची चर्चा आहे.. लोकसभेच्या 23 जागा लढवण्यावर ठाकरे गट ठाम आहे. विशेष म्हणजे जिथे ठाकरे गटाचे खासदार नाहीत त्या अकोला आणि ईशान्य मुंबईच्या जागेवरही ठाकरे गटाने दावा केलाय. ठाकरे गटानं कोणत्या 23 जागांवर दावा केला.
मविआतलं जागावाटप मेरिटनुसारच होणार…मविआत जागावाटपावरुन कोणतीही धुसफूस नाही असं स्पष्टीकरण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलंय…जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र असून, ज्याचा भक्कम उमेदवार त्याला जागा मिळेल…यासोबतच मविआत येण्याबाबत वंचितशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती राऊतांनी दिली…काँग्रेसला मात्र ठाकरे गटाचा हा दावा मान्य नाही. काँग्रेसनं ठाकरे गटाची ही मागणी अक्षरश: धुडकावून लावलीय.
जागावाटपावरुन जुंपलेली असताना वंचित बहुजन आघाडीनं एक वेगळाच प्रस्ताव ठेवला
शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरुन जुंपलेली असताना वंचित बहुजन आघाडीनं एक वेगळाच प्रस्ताव ठेवलाय. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट आणि वंचित आघाडी या चारही पक्षात लोकसभेच्या 48 जागांचं समसमान वाटप करावं आणि प्रत्येकी 12 जागा लढवाव्या असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीनं दिलाय.