no images were found
राजकुमार हिरानी यांच्या निदर्शनास आल्यानंतर रोहिताश्व गौड यांनी चित्रपट ‘डंकी’मध्ये भूमिका साकारली
एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील आयकॉनिक भूमिका मनमोहन तिवारीसाठी प्रसिद्ध रोहिताश्व गौड यांनी टेलिव्हिजन व बॉलिवुड क्षेत्रात स्वत:चे नावलौकिक केले आहे. त्यांच्या अपवादात्मक विनोदीशैलीने त्यांना मनोरंजन क्षेत्रातील प्रतिभावान कलाकार म्हणून त्यांचे स्थान प्रबळ केले आहे. नुकतेच, गौड यांनी राजकुमार हिरानी यांचा चित्रपट ‘डंकी’मध्ये फसवणूक करणाऱ्या व्हिसा एजंटची भूमिका साकारली. गप्पागोष्टी करताना त्यांनी ही भूमिका कशाप्रकारे मिळाली याबाबत सांगितले.
शाहरूख खान अभिनीत चित्रपटामध्ये काम करण्याबाबत रोहिताश्व गौड म्हणाले, ”यावर विश्वास बसत नाही आहे, पण आश्चर्यकारकपणे मला ही मोठी संधी मिळाली. रोचक बाब म्हणजे हे सर्व एका दिवसात घडले. मी नायगावमध्ये माझी मालिका ‘भाबीजी घर पर है’साठी शूटिंग करत होतो. व्यस्त प्रवासामुळे मी सेटजवळ एका सदनिकेमध्ये राहतो आणि सु्ट्टी मिळाली की गोरेगाव येथील माझ्या घरी जातो. आम्हाला दुसऱ्या दिवशी शूटिंग करायची होती, पण अनपेक्षिपणे मला सकाळी बातमी मिळाली की आम्हाला कामावर एक आठवडा सुट्टी मिळाली आहे. मी या ब्रेकचा उपयोग करत माझ्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करण्यासाठी घरी जाण्याचे ठरवले. घरी जात असताना मला राजकुमार हिरानी जी यांचा कॉल आला, त्यांनी मला माझ्या ठावठिकाणाबाबत विचारले. मी त्यांना सांगितले की मी माझ्या घरी जात आहे. त्यांनी मला अधिक काही न सांगता गोरेगावमधील फिल्मसिटीला येण्यास सांगितले. तेथे पोहोचल्यानंतर मी सेटवरील हजारो व्यक्तींची गर्दी पाहून भारावून गेलो. त्यानंतर श्री. हिरानी यांनी मला सांगितले की ते पंजाबमधील सुप्रसिद्ध थिएटर कलाकारासोबत एका सीनचे चित्रीकरण करत होते, जो त्या चित्रपटामध्ये ती भूमिका साकारणार होता. पण काही कारणास्तव तो तेथे येऊ शकला नाही. चित्रपटाच्या शूटिंगचा तो पहिलाच दिवस होता आणि श्री. हिरानी यांनी काहीही करून चित्रीकरण न थांबवण्याचा निर्धार केला होता. तो चित्रपटाच्या शूटिंगचा पहिलाच दिवस होता आणि राजकुमार हिरानी जींना कोणतेही व्यत्यय नको होते, ज्यामुळे त्यांनी त्वरित माझा विचार केला. मी यापूर्वी देखील त्यांच्यासोबत काम केले आहे. सरांनी मला त्यांचा चित्रपट ‘डंकी’मधील फसवणूक करणारा पंजाबी व्हिसा एजंट लालटूची भूमिका ऑफर केली. मी मनापासून ही प्रभावी भूमिका स्वीकारली. त्यांनी मला भूमिका व सीनबाबत सविस्तरपणे सांगितले, ज्यामुळे मला पंजाबी भाषाशैलीवर काम करता आले. शूटिंगनंतर राजकुमार जींनी माझ्या घरी मोठा पुष्पगुच्छ पाठवला आणि माझे आभार व्यक्त केले. ते अत्यंत छान गेस्चर होते.”
राजकुमार हिरानी यांच्यासोबतच्या त्यांच्या चांगल्या संबंधाबाबत सांगताना अभिनेते म्हणाले, ”मी १९९७ मध्ये डीडी१ चॅनेलवरील त्यांच्या एका शोसाठी ऑडिशनकरिता मुंबईमध्ये आलो होतो, तेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो. दुर्दैवाने, तो शो पडद्यावर कधीच आला नाही. पण, राजकुमार यांनी मला त्यांच्या भावी प्रोजेक्ट्समध्ये संधी देण्याचे वचन दिले आणि चित्रपट ‘डंकी’मधील भूमिका त्यापैकीच एक संधी आहे. मी हिरानी जी यांच्यासोबत त्यांची प्रसिद्ध अॅन्थोलॉजी सिरीज ‘द बेस्टसेलर्स’मध्ये काम केले आहे, जेथे मी प्रमुख भूमिका साकारली. आमच्यामध्ये नाते अत्यंत छान आहे. ‘डंकी’साठी शूटिंग करण्याचा अनुभव आनंददायी होता. हिरानी जी यांनी चित्रपटाचे लेखक अभिजत जोशी आणि तापसी पन्नू यांच्याशी माझी ओळख करून दिली. तापसीने मला मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील माझ्या भूमिकेसाठी ओळखले, जे आनंददायी सरप्राइज होते. तापसी देखील या मालिकेची चाहती आहे. मला अशा मोठ्या चित्रपटामध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळेल असा मी कधीच विचार केला नव्हता, पण सर्वकाही आपसूक घडले (हसतात). तो माझ्यासाठी अद्भुत योगायोग व उत्साहवर्धक अनुभव होता.’