Home मनोरंजन  मदर्स डे च्या निमित्ताने सोनी सबवरील कलाकार आपल्या आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत आहेत

 मदर्स डे च्या निमित्ताने सोनी सबवरील कलाकार आपल्या आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत आहेत

16 second read
0
0
35

no images were found

 मदर्स डे च्या निमित्ताने सोनी सबवरील कलाकार आपल्या आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत आहेत

 

मदर्स डे समस्त मातांचे प्रेम आणि त्याग याच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने, आपले कुटुंब आणि समाज यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. या मदर्स डे ला सोनी सबवरील कलाकार आठवणींत हरवले आहेत आणि आपल्या जीवनाला आणि कारकिर्दीला आकार देण्यात आपल्या आईच्या अमूल्य योगदानाबद्दल तिचे उपकार स्मरत आहेत. आपल्या आईच्या गोड आठवणींपासून ते तिच्याबद्दल त्यांना वाटणारे प्रेम अशा त्यांनी मनमोकळेपणाने व्यक्त केलेल्या सर्वच भावनांमधून आईच्या निरपेक्ष प्रेमाची एक झलक मिळते.

सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाची भूमिका साकारणारी करुणा पांडे म्हणते,“आई हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आई ही अशी व्यक्ती असते, जी तुम्हाला सगळ्यात जास्त ओळखत असते. तुम्हाला या जगात आणण्यासाठी ती माऊली 9 महीने स्वतःच्या पोटात तुम्हाला सांभाळते आणि आयुष्यभर तुमच्यावर निरपेक्ष प्रेम करते. माझी आई फारच प्रेमळ आणि विनम्र आहे. कोणाहीविषयी तिच्या मनात अढी नसते.”

सोनी सबवरील ‘वंशज’ मालिकेत युविकाची भूमिका करणारी अंजली तत्रारी म्हणते“आईचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिच्याशिवाय आपले अस्तित्त्वच नाही! मी 4 वर्षांची असताना माझे वडील देवाघरी गेले, त्यानंतर एकट्या आईनेच माझा सांभाळ केला. मी नेहमी माझ्या आईला काबाडकष्ट करताना पाहिले आहे. आमचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी, माझ्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी तिने आपल्या स्वप्नांची आहूती दिली. मी आज हे अभिमानाने सांगू शकते की, आज मी जी कोणी आहे, ती केवळ माझ्या आईने मला दिलेल्या संस्कारांमुळेच आहे. माझ्यात माझ्या आईसारखे संयम आणि शांतपणा हे गुण असावे असे मला वाटते. मी तिच्यासारखी 1% जरी बनू शकले तरी मला आनंद होईल.”

 सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ मालिकेत पल्लवीची भूमिका करणारी आयुषी खुराना म्हणते,“माझ्या आईशिवाय मी आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. आई ही जगातली सर्वात निःस्वार्थी व्यक्ती असते. आपले मूल या जगात येण्याआधीपासूनच ती त्याच्यावर प्रेम करत असते. या जगात आईच्या प्रेमाची तुलना कशाशीच होऊ शकणार नाही कारण तिचे प्रेम सर्वात निर्मळ असते. माझ्या आईची समर्पण वृत्ती मला नेहमीच प्रेरित करते. ती जे काही करते ते अत्यंत समरसून, जीव ओतून करते, ज्याचे मला फार कौतुक वाटते. मी लहान असल्यापासून तिच्याकडे प्रेमादराने बघत आले आहे.”

सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ मालिकेत दीपिकाची भूमिका करणारी नीता शेट्टी म्हणते“माझी आई हे माझे सर्वस्व आहे. ती केवळ माझी पालक नाही, तर माझी मैत्रीण, गुरु आणि प्रेरणास्रोतही आहे. तिचा आधार आणि मार्गदर्शन यातूनच मी आज आहे ती घडले आहे. कठीण प्रसंगात तिचा चिवटपणा पाहून मला कधीही हार न माणण्याची शिकवण मिळाली आहे. मला वाटते की, मुलींना संगोपन करण्याची वृत्ती आपल्या आईकडून वारशात मिळते. माझ्यात देखील नकळत प्रेम, करुणा आणि मदत करण्याचे गुण आले आहेत.”

 सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत अश्विनची भूमिका करत असलेला नवीन पंडिता म्हणतो, “माझी आई म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहे. ती केवळ माझी आई नाही, तर माझी मैत्रीण देखील आहे. तिच्याशिवाय माझे पान हलत नाही. ती फारच प्रेमळ, कनवाळू आणि विनम्र आहे. ती कोणताही राग मनात न ठेवता, कुणाच्याही मदतीला लगेच धावून जाते. मला वाटते, एक स्त्री जेव्हा आई होते, तेव्हा तिच्यात तिच्या आईचे संगोपनाचे गुण आपसूक येतात कारण या भावना आपल्या जीन्समध्येच असतात.”बघत रहा, ‘पुष्पा इम्पॉसिबल’, ‘वंशज’ आणि ‘आंगन – अपनों का’ फक्त सोनी सबवर, प्रत्येक सोमवार ते शनिवार!

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…