Home मनोरंजन ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत स्वराच्या शिक्षकाच्या कडक वर्तनाविरुद्ध पुष्पा उभी ठाकणार

‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत स्वराच्या शिक्षकाच्या कडक वर्तनाविरुद्ध पुष्पा उभी ठाकणार

6 second read
0
0
36

no images were found

पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत स्वराच्या शिक्षकाच्या कडक वर्तनाविरुद्ध पुष्पा उभी ठाकणार

सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ ही मालिका प्रेक्षकांना सकारात्मक वृत्तीने सगळ्या संकटांना तोंड देणाऱ्या पुष्पा (करुणा पांडे) या करारी स्त्रीची हृद्य कहाणी दाखवते. अलीकडच्या भागांमध्ये, प्रेक्षकांनी पाहिले की, स्वरा (वृही कोडवारा) चाळीतल्या आपल्या नव्या कुटुंबाशी जुळवून घेण्याची धडपड करत आहे. कारण तिला दत्तक घेतलेले असल्यावरून आसपासचे लोक तिला चिडवत आहेत. आपण येथे उपरे आहोत का असे तिला वाटू लागले आहे. पण पुष्पाचे समस्त कुटुंब तिच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि तिला हे आश्वासन देत आहेत की, ते सगळेजण तिच्यावर प्रेम करतात आणि नेहमी तिच्यासोबत असतील. यामुळे तिला दिलासा वाटतो.

आगामी भागांमध्ये स्वरा एका शाळेत दाखल होते. अश्विन (नवीन पटेल), चिराग (दर्शन गुर्जर) आणि प्रार्थना (इंद्राक्षी कांजीलाल) या तिघांनाही स्वराला मदत करायला वेळ न मिळाल्यामुळे शाळेतला तिचा गृहपाठ अपूर्ण राहतो आणि त्याबद्दल तिला शाळेत शिक्षा होते. तिला शिक्षा म्हणून तिचे शिक्षक संपूर्ण दिवस तिला टेबलावर उभी ठेवतात त्यामुळे ती कोवळी पोर घाबरून जाते. भांबावलेल्या स्वराला पाहून पुष्पा तिच्या शाळेत जायचे ठरवते. पुष्पा शाळेत जाऊन स्वराच्या शिक्षकाला बोल लावते, पण शिक्षक तिचे आरोप नाकारतो. त्यामुळे पुष्पा या शिक्षकाच्या विरोधात उभे राहण्याचे ठरवते. पुष्पाचे पुढचे पाऊल काय असेल याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहील.

पुष्पाची भूमिका साकारणारी करुणा पांडे म्हणते, “पुष्पा ही अशी स्त्री आहे, जी नेहमीच न्यायासाठी लढा देते. स्वराची स्थिती पाहून लहान मुलांना इतकी कठोर वागणूक देण्याच्या प्रथेविरुद्ध ती ठाम उभी राहते. लहान मुले तर मातीच्या गोळ्यासारखी असतात आणि वाईट अनुभवामुळे त्यांच्या जडणघडणीवर वाईट परिणाम होऊ शकतो. या कोवळ्या वयातल्या मुलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे. जेणे करून त्यांना एकटेपणा येणार नाही आणि या जगात वाटचाल करून आपला मार्ग शोधण्याचे बळ त्यांना मिळेल.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…