
no images were found
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘अष्टपदी’ चित्रपटाचा मुहूर्त
साडे तीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा असलेल्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत ‘अष्टपदी’ या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. ‘अष्टपदी’ हा चित्रपटही त्याच पठडीतील ठरणार आहे. भारतीय विवाह संस्कृतीमध्ये सप्तपदीला खूप महत्त्व आहे, पण या चित्रपटाचं शीर्षक ‘अष्टपदी’ असल्याने यात नेमकं काय पाहायला मिळणार याबाबत कुतूहल जागं होतं. ‘अष्टपदी’च्या रूपात एक संगीतमय त्रिकोणी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी ‘अष्टपदी’ या वेगळ्या विषायावर आधारलेल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘अष्टपदी’च्या दिग्दर्शनाची जब…