Home मनोरंजन अर्जुन बिजलानी बनला गायक

अर्जुन बिजलानी बनला गायक

0 second read
0
0
36

no images were found

अर्जुन बिजलानी बनला गायक

झी टीव्हीवरील ‘प्यार का पहला अध्याय शिवशक्ती’ने आपल्या रोचक कथानकासह नेहमीच प्रेक्षकांना आपल्या स्क्रीन्सना खिळवून ठेवले आहे. शिव (अर्जुन बिजलानी) आणि शक्ती (निक्की शर्मा) यांच्यातील ह्या प्रेमकथेने त्यांच्या उत्तम ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसह प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हल्लीच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की कसे मंदिरा (परिणीता बोरठाकूर) शिवचे अपहरण करवते पण शक्ती कुटुंबातील बाकीच्या सदस्यांच्या मदतीने त्याला सोडवते. टीम ह्या अतिशय गहन अशा ऑनस्क्रीन नाट्‌यासाठी चित्रीकरण करत असताना शॉट्‌सच्या दरम्यान आपल्या मधुर आवाजाने टीमचे मनोरंजन करण्याची जबाबदारी अर्जुनने उचलली.

अर्जुन बिजलानीने स्वतःला एक उत्तम अभिनेता आणि सूत्रधाराच्या रूपात सिद्ध केले असून आता त्याच्या आणखी एक सुप्त गुण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे त्याची गायनाबद्दलची आवड. अर्जुनने हल्लीच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमाने तो एक गोड गाणे गाऊन आपल्या टीमचे मनोरंजन करत असल्याचा मस्त व्हिडीओ शेअर केला.

अर्जुन म्हणाला, “खरंतर मी काही प्रोफेशनल गायक नाहीये पण असेही काही दिवस असतात जेव्हा सर्वांचा मूड हलका करण्यासाठी मला गायला आवडतं. मला वाटतं की आपल्यापैकी बहुतेकांसाठी संगीत हे स्ट्रेसबस्टर म्हणजेच तणाव घालवण्याचे माध्यम आहे आणि त्यामुळे आपले मन शांत आणि ताजेतवाने होण्यास मदत होते. मला गायला आवडतं पण मी ते कधी प्रोफेशनली केले नाहीये. आम्ही जेव्हा प्यार का पहला अध्याय शिवशक्तीच्या सेटवर चित्रीकरण करत असतो तेव्हा आम्ही सगळे दोन शॉट्‌सच्या दरम्यान आपापल्या रूम्समध्ये जायच्याऐवजी खूप समय एकत्र व्यतीत करतो. त्यामुळे जेव्हा आम्ही पुढच्या शॉटची प्रतीक्षा करत होतो तेव्हा मी गाणे गाऊन सर्वांचा मूड बनवण्याचा प्रयत्न केला. ते खूपच अचानक होते पण मला खूप आनंद झाला कारण माझी अख्खी टीम माझ्यासोबत गाऊ लागली. हेच दिवस आणि क्षण आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू आणि आशा आहे की प्रेक्षकांसोबत मी माझ्या टीमचेही असेच मनोरंजन करत राहिन.”

हे तर खूपच मजेदार वाटतंय!

सेटवर अर्जुन सर्वांचे मनोरंजन करत असून आगामी भागांमध्ये हे पाहणे प्रेक्षकांसाठी रोचक ठरेल की शिवला वाचवण्यासाठी मंदिराने पाठवलेल्या गुंडांपासून शक्ती त्याला आणि स्वतःला कशी वाचवेल. काय शक्ती मंदिराचे सत्य सर्वांसमोर उघड करू शकेल? की मंदिरा आपल्या योजनेमध्ये यशस्वी होईल?

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…