no images were found
“माझा स्त्री अवतार घेणे हा नेहमीच विनोदी प्रकार नसून त्यामुळे नाट्य अधिक रंगतदार होईल -शब्बीर आहलुवालिया
झी टीव्हीवरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’ ही आधुनिक काळातील वृंदावनमध्ये घडणारी एक परिपक्व प्रणयी नाट्य असून सुरूवातीपासूनच ही मालिका प्रेक्षकांची आवडती बनलेली आहे. मनमोहक कथानक आणि ह्या मालिकेतील मोहन (शब्बीर आहलुवालिया), राधा (नीहारिका रॉय) आणि दामिनी (संभाबना मोहन्ती) अशा बळकट व्यक्तिरेखांनी गेले दीड वर्ष प्रेक्षकांना आपल्या खुर्चीला खिळवून ठेवले आहे. अलिकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की मोहनचा आवाज हळूहळू बदलत जातो, त्याचे डोळे लाल होतात आणि नखे रंगीत होतात. हे सगळे पाहून राधा आणि त्याच्या कुटुंबियांना धक्काच बसतो. आगामी भागांमध्ये काय होते ते पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटाच येईल. शब्बीर आहलुवालियाचे चाहते त्याला शारीरिकदृष्ट्या स्त्री अवतारात बदलल्याचे पाहतील.आपले हे रूप अगदी खरे वाटावे म्हणून टीव्हीवरील ह्या सुपरस्टारने त्याचा हा नवीन अवतार प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मोहनच्या व्यक्तिमत्त्वामध्ये येणारे हे बोल्ड ट्रांसफॉर्मेशन ह्या मालिकेच्या कथेमध्ये नक्कीच क्रांतिकारी बदल घडवेल, एक मोठे सत्य प्रभावीपणे उघड करेल आणि सगळी कायाच पालटवून टाकेल.
शब्बीर म्हणाला, “अनेक कलाकारांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्या ना कुठल्या वेळी क्रॉस-ड्रेसिंग केले आहे, पण ते बहुधा विनोद निर्मितीसाठी करण्यात आले आहे. मात्र, माझ्या व्यक्तिरेखेचे स्त्री अवतारात रूपांतर झाल्यामुळे कथानकातील नाट्यात आणि प्लॉटमधील बहुप्रतीक्षेतील हायपॉईंटच्या गांभीर्यात भर पडेल. मी ह्या गोष्टीला एका आव्हानाच्या स्वरूपात स्वीकारले असून माझे सर्वस्व मी ह्या भूमिकेला देत आहे. मी अगदी टिपीकलपणा न आणता सहजपणे पण मर्यादा राखून ही भूमिका साकारत आहे. मी आशा करतो की मी ह्या पटकथेला न्याय दिला असून मनाची पकड घेणाऱ्या ह्या दृश्याचा प्रभाव प्रेक्षकांना नक्कीच जाणवेल.”शब्बीर ह्या नवीन अवताराला एक आव्हान समजून त्याला सामोरे जात असताना प्रेक्षकांसाठी हे पाहणे रोचक ठरेल की काय दामिनी तिचा अपराध कबूल करते की नाही?