no images were found
कराड आणि साताऱ्यामध्ये हृदयाच्या आजारांचे प्रमाण वाढण्याच्या समस्येचे निवारण
कराड : वर्ष संपत असताना हाती आलेल्या माहितीनुसार, कराड आणि साताऱ्यामधील ग्रामीण भागांमध्ये हृदयरोगांचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढत असल्याचे समोर आले आहे. सह्याद्रि हॉस्पिटल्स, कराडमधील आघाडीचे कार्डिओव्हस्क्युलर आरोग्य तज्ञ डॉ सचिन निकम यांनी या वाढत असलेल्या आरोग्य समस्येचे निवारण करण्यासाठी जागरूकता व निवारक उपाययोजना तातडीने करण्याच्या निकडीवर भर दिला आहे.
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स कराडचे कार्डिओलॉजिस्ट डॉ सचिन निकम म्हणाले, “हल्लीच्या काही महिन्यांमध्ये कराड आणि साताऱ्यासारख्या भागांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे आमच्या लक्षात आले आहे. ग्रामीण भागातील व्यक्तींनी सर्व प्रकारचे हृदयाचे आजार आणि उच्चरक्तदाब याबाबत सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे..”महाराष्ट्रातील साताऱ्यामध्ये १९ सप्टेंबर २०२३ रोजीच्या आकडेवारीनुसार, जवळपास ८०.४७% नागरिकांना कोविड-१९ लसीचा कमीत कमी एक डोस मिळालेला आहे आणि जवळपास ६७.१९% लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नुकत्याच केलेल्या संशोधनावरून कोविड-१९ संसर्ग आणि कार्डिओव्हस्क्युलर गुंतागुंतीमध्ये वाढ यांच्यात संभाव्य लिंक असल्याचे सुचवण्यात आले आहे. पण कोविड-१९ लसीकरणामुळे गंभीर केसेसच्या धोक्यामध्ये, रुग्णालयात भरती कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली, परिणामी, कार्डिओव्हस्क्युलर आजाराच्या घटना आणि मृत्यू यामध्ये घट होण्याचा संभव आहे.
डॉ निकम यांनी पुढे सांगितले, “तंतोतंत यंत्रणेचा अजूनही अभ्यास केला जात असताना, असे पुरावे आहेत की कोविड–१९ लसीकरण हृदयाशी संबंधित गंभीर गुंतागुंतीची जोखीम कमी करण्यात योगदान देते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणाची महत्त्वपूर्ण भूमिका यामध्ये अधोरेखित केली जाते. कोविड संसर्ग स्वतःच एक भूमिका बजावू शकतो, परंतु जीवनशैलीशी निगडित घटक आणि आधीपासूनच्या सहव्याधी यांचा संपूर्ण आरोग्यावर खूप प्रभाव पडतो.” येत्या काही वर्षात ग्रामीण भागातील ६० ते ६९ वर्षे वयोगटामध्ये कार्डिओव्हस्क्युलर आजारांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागरूकतेचा अभाव, निदान करण्यात न आलेले मधुमेह आणि हायपरटेन्शन यासारखे आजार, वैद्यकीय सेवांची कमतरता आणि तंबाखू व अल्कहोल व्यसन ही यामागची कारणे आहेत.ग्रामीण भागात हृदय रोगांची अनेक वेगवेगळी कारणे आहेत. हायपरटेन्शन, मधुमेह, तंबाखू आणि अल्कहोल व्यसन इत्यादींचा त्यामध्ये समावेश असतो. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये घशाचे संसर्ग वेळीच लक्षात न आल्यास भविष्यात हार्ट वाल्वचे आजार होऊ शकतात. संपर्क व संवादांमधील अडथळे, वाहतुकीच्या मर्यादित सोयीसुविधा आणि वैद्यकीय प्रोफेशनल्सची कमतरता यामुळे हृदयाचे आजार लवकर लक्षात येणे व त्यावर वेळीच उपचार केले जाणे कठीण होऊन बसते.
डॉ निकम म्हणाले, “तंबाखूचे अति सेवन, फळे व भाज्या पुरेशा प्रमाणात न खाणे आणि तेल व लाल मांसाचे सेवन यामुळे ग्रामीण भागात हृदय रोगाचा धोका वाढला आहे. हे धोकादायक घटक दूर सारून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करणे समस्येच्या निवारणासाठी महत्त्वाचे आहे.”हृदयाचे आजार लवकरात लवकर लक्षात आले पाहिजेत. खासकरून आरोग्य देखभाल सेवा मर्यादित असलेल्या भागांमध्ये हे खूप महत्त्वाचे आहे. हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्युअर यासारख्या जीवघेण्या आणीबाणी टाळण्यासाठी ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी नियमितपणे तपासणी, रक्ततपासणी, इलेक्ट्रॉकार्डिओग्राम आणि स्ट्रेस टेस्ट्स करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.ग्रामीण भागात हृदय आजारांचे प्रमाण वाढत असल्यामुळे बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. यामध्ये जागरूकता अभियान, आरोग्य देखभाल सेवांच्या उपलब्धतेमध्ये वाढ आणि सक्रिय जीवनशैली यांचा समावेश असला पाहिजे. हृदयाच्या आरोग्याविषयी जागरूकतेला प्रोत्साहन देणाऱ्या संस्कृतीचा स्वीकार करून कार्डिओव्हस्क्युलर आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जाऊ शकतील.