Home क्राईम रशियातील शाळेत गोळीबार; ९ ठार, २० जण जखमी, हल्लेखोराची आत्महत्या

रशियातील शाळेत गोळीबार; ९ ठार, २० जण जखमी, हल्लेखोराची आत्महत्या

0 second read
0
0
109

no images were found

रशियातील शाळेत गोळीबार; ९ ठार, २० जण जखमी, हल्लेखोराची आत्महत्या
मास्को : रशियातील इझेव्हस्क येथील एका शाळेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात नऊजण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. तर हल्लेखोराने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शाळेमध्ये सुरक्षा आणि मदत बचाव पथके पोहोचली आहेत.
या घटनेमुळे युक्रेन युद्धादरम्यान खळबळ माजली आहे. रशियाची अधिकृत वृत्तसंस्था टासने याबाबतचे वृत्त दिले आहे. एएफपी न्यूज एजन्सीने अंतर्गत मंत्रालयाच्या हवाल्याने मध्य रशियामधील शाळेत गोळीबार झाल्याचे वृत्त दिले आहे. प्राथमिक अहवालानुसार, मध्य रशियामधील एका शाळेत गोळीबाराच्या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.
रशियाच्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला. ती शाळा रिकामी करण्यात आली असून आजूबाजूच्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराचा आवाज ऐकल्याने घाबरलेले विद्यार्थी आणि शाळेतील इतर कर्मचारी शिक्षक घटनेच्या वेळी एका छोट्या खोलीत लपून बसले होते. या घटनेचा आधिक तपास सुरू आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …