no images were found
शिवाजी विद्यापीठात अन्वेषण (वेस्ट झोन) स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी): असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीस (एआययू) नवी दिल्ली, व शिवाजी विद्यापीठातील संगणकशास्त्र अधिविभाग व विद्यार्थी विकास विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने “अन्वेषण (वेस्ट झोन) – विद्यार्थी संशोधन अधिवेशन” या स्पर्धेचे आयोजन दि. २८-२९ डिसेंबर २०२३ रोजी करण्यांत आले आहे. सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्र व गुजरात मधील १० विद्यापीठामधून एकूण ११४ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा एकून ६ प्रकारात होणार आहे. i) शेती, ii) मूलभूत विज्ञान, iii) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, iv)
आरोग्य विज्ञान आणि संबंधित विषय, फार्मसी, पोषण इ. v) सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र, वाणिज्य आणि कायदा, vi) आंतरविद्याशाखा या प्रकारात होणार आहे.
संशोधनाची योग्यता आणि करिअर पर्याय म्हणून संशोधन स्वीकारण्याची आवड असलेल्या तरुण प्रतिभांना ओळखणे. सदर स्पर्धेची प्रमुख उदिष्टे ;
संपूर्ण देशात संशोधनातील प्रतिभेला प्रोत्साहन देणे., तरुण संशोधकांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी विविध प्रायोजकांच्या सहकार्याने आर्थिक आणि भौतिक
संसाधने वाढवणे.,संभाव्य विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी योग्य प्रोत्साहन देणे., निवडलेल्या संस्थांच्या गटामध्ये गहन संशोधन संस्कृती सुरू करणे
सदर स्पर्धेसाठी डॉ अमरेंद्र पानी, सहसंचालक आणि प्रमुख, संशोधन विभाग, एआययू, नवी दिल्ली व डॉ. उषा राय-नेगी, सहाय्यक संचालक (संशोधन), एआययू, नवी दिल्ली यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मा. कुलगुरू डी. टी. शिर्के, डॉ. पी. टी. गायकवाड, संचालक विद्यार्थी विकास विभाग डॉ. कविता ओझा, संगणकशास्त्र अधिविभागप्रमुख
अन्वेषन म्हणजे काय?
अन्वेषन हे एक व्यासपीठ आहे – असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने – विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची संशोधन क्षमता आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समुदायाला भारतातील 1,000 हून अधिक विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसोबत सहयोगी प्रकल्पांवर काम करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केले आहे.