
no images were found
मगर मठीमध्ये दत्त जयंती उत्साहात
कोल्हापूर – संभाजीनगर येथील मगर मठीमध्ये भक्तांच्या उत्साहात दत्त जयंती झाली.
दत्त जयंतीनिमित्त अनुसया माता भोजनाची अलंकारिक पूजा साकारण्यात आली. यासाठी श्रीकांत मगर, रवींद्र शिंदे, प्रशांत जाधव, संदीप कदम, सनी कोरे यांनी सहकार्य केले. सायंकाळी सहा वाजता जन्मसोहळा संपन्न झाला. दरम्यान, येत्या गुरुवारी (ता. २८) सकाळी अभिषेक, आरती व सायंकाळी आरती, जप, गजर होऊन रात्री आठ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठीतर्फे देण्यात आली.