संयुक्त न्यू शाहूपुरी ख्रिस्ती तरुण मंडळाच्या वतीने नाताळ उत्साहात साजरा. कोल्हापूर ,:-संयुक्त न्यू शाहूपुरी बेकर गल्ली कोल्हापूर येथील मंडळाच्या वतीने नाताळाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी येशूचा जन्म गोट्यामध्ये ( गव्हाणी )झाला. त्यावेळचे दृश्य या ठिकाणी साकारण्यात आलेआहे. यावेळी येशू जन्माचा संदेश दिला गेला. विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्याबरोबरच, सृष्टीचे सर्व आचाराचे मंगलमय होऊ दे,अशी प्रार्थना ही करण्यात आली . यावेळी अब्राहम वाघमारे ,उबेद वाघमारे ,विशाल कुरणे ,तेजस कुरणे ,विल्सन जाधव , होषय जाधव ,अमर कुरणे, गौरव गायकवाड ,अनोष गायकवाड, शाबेद वाघमारे, अबनेजर जाधव ,रॉजर धनवडे , अलोन अँथनी, जॉनटी जाधव ,रॉबर्ट जाधव, स्टीफन यादव , शलतील यादव ,भाऊसो यादव, मिलिंद लोखंडे इत्यादी कार्यकर्ते हजर होते.