no images were found
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी झाली एकूण अडीच कोटीच्या आसपास उलाढाल
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “सतेज कृषी प्रदर्शन २०२३” प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशी तपोवन मैदानावर अलोट गर्दी केली. यावर्षीचे प्रदर्शनाचे पाचवे वर्ष असून अडीचशे हून अधिक स्टॉल, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग,अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, विदेशी भाजीपाला, कोल्हापूर जिल्ह्यात पिकविण्यात आलेला भाजीपाला,फुले,शेततळे आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तपोवन मैदानावर मोठी गर्दी केली आहे.प्रदर्शनात एकूण अडीच कोटीच्या आसपास उलाढाल ही झाली आहे.
साडेपाच फूट लांब शिंग असलेली १० लिटर दुध देणारी पंढरपुरी म्हैस, राजा नावाचा जाफराबादी रेडा, कमी उंचीची ४ वर्षे वयाची कुंगनूर जातीची गाय, अमेरिकन सिल्क जातीची पायावर केस असलेली कोंबडी,७०हजार रुपये किंमतीचा ९७ किलोचा बोकड,बिटेल जातीचा बकरा,माडग्याळ मेंढा,भारतीय वंशाची जाड शिंग असलेली काँग्करेज जातीची गाय,शाहू नावाचा घोडा,साडेसहा वर्षाचा मसाई पठार येथील नंदी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.
नर्सिहवाडी बुबणार येथील ८६०३२,ऊस वान व ९०२७,१८१२ ऊसाचे देशी वाण व अर्चना खरोटे यांनी पिकविलेला विदेशी भाजीपाला व स्थानिक भाजीपाला व माद्याळ येथील हिरवी व लाल मिरची ठरत आहे खास आकर्षण याचबरोबर विविध कँपन्यांची उत्पादने विविध प्रकारची ट्रॅकटर्स मांडण्यात आली आहेत हेही आकर्षण ठरत आहेत.
या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी झाल्या असून यामध्ये गोकुळ दूध संघ व त्यांची उत्पादने,ओंकार बंब, पाटील ऑईल मशीन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गोकुळ दूध संघ,या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी झाल्या आहेत. शेतीची अवजारे, खते औषधे,आदी कंपन्या सहभागी झाल्या आहेत.या कंपन्याची उत्पादने पाहावयास मिळत आहेत.व शेतकरी या साहित्यांची खरेदी करत आहेत. शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन औजारे पहावयास मिळत आहेत.व खाद्य महोत्सव अंतर्गत विविध पदार्थांचा आस्वाद ही शेतकरी घेत आहेत.
प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव भरविण्यात आला असून तांदळाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी,हात सडीचा अशा नमुन्यांचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे.ज्याची विक्री ही होत आहे.शिवाय राधानगरी येथील घरगुती हळद,व अन्य शेतकरी यांची हळद,मसाले,सेंद्रिय गूळ नाचणी,उडीद,विविध फळे पेरू,मसाले,विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांची खरेदी होत आहे.प्रशासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागा अंतर्गत या ठिकाणी शेततळे उभा करण्यात आले आहे. याचबरोबर प्रदर्शनामध्ये जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने तुती बने रेशीम आळी,त्यापासून रेशीम निर्मिती पहावयास मिळत आहे.
साडेपाच फूट लांब शिंग असलेली पंढरपुरी म्हैस, राजा नावाचा जाफराबादी रेडा, कमी उंचीची ४ वर्षे वयाची कुंगनूर जातीची गाय,३ वर्षे ६ महिने वय असलेली ९ लिटर दुध देणारी दानोळी येथील मुऱ्हा जातीची म्हैस, लांब शिंग असलेली पांढरे बैल
अमेरिकन सिल्क जातीची पायावर केस असलेली कोंबडी,७०हजार रुपये किंमतीचा ९७ किलोचा बोकड(पालवं),बिटेल जातीचा बकरा,माडग्याळ मेंढा,भारतीय वंशाची जाड शिंग असलेली काँग्करेज जातीची गाय,शाहू नावाचा घोडा प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.याचबरोबर प्रदर्शनात आशिया खंडातील काठेवाडी जातीचा घोडा,कागल मशील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म मांडण्यात आली आहे.ज्यात पांढरे रंगीबेरंगी कबुतरे,ससे,मांजर,बदक,राजहंस,लवबर्ड,आदी जनावरे प्रदर्शनात आली आहेत जे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.
स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास मिळत आहे.भाज्यांमध्ये सिमला मिरची,मुळा, दुधी भोपळा,हळद, टोमॅटो,माद्याळ येथील हिरवी व लाल मिरची फ्लॉवर, आदींसह विदेशी भाजीपालामध्ये लाल बायोण्डा, बेसी,गोकुली, चेरी टोमॅटो,रेड कॅबीज,चायनीज कॅबीज आदी भाजीपाला समाविष्ट आहे. तर फुलांमध्ये जरबेरा,रॉयज अँड शाईन,निशिंगध,जिप्सी फिलिया,औरचिड अशा फुलांचा समावेश आहे.
याचबरोबर फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश असल्याने याठिकाणी गर्दी ही लहान मुलांसह आबालवृद्ध आणि शेतकरी करत आहेत.प्रदर्शनामध्ये खाद्य महोत्सव भरविण्यात आला असून याठिकाणी कोल्हापूरकर आस्वाद घेत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जात आहे. तर पाणलोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन,ठिबक सिंचन, गांडूळ खत युनिट आणि हायड्रोलिक चारा तयार करणे याचीही माहिती दिली जात आहे.
सतेज कृषी प्रदर्शनामध्ये आज २३ डिसेंबर रोजी आधुनिक शेती, तंत्रज्ञान,दूध उत्पादन, फळे,भाजीपाला प्रक्रिया तसेच रेतन पद्धती, याबद्दल विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले . हे मार्गदर्शन, माहिती घेण्यासाठी आणि चर्चासत्रासाठी जिल्ह्यातील हजारो महिला आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी किशोर राठोड, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्रकुमार सुर्यवंशी, कृषीतज्ञ प्रताप चिपळूणकर, डॉक्टर अमोल येडे, आणि डॉक्टर परीक्षित देशमुख यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती दिली .
यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक किशोर राठोड यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच आधुनिकीकरण तसंच महा अँग्रो मार्टची माहिती सांगितली . महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कार्याबाबतचा आढावा त्यांनी यावेळी घेतला . त्यानंतर कराड इथल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड सायन्स विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्रकुमार सुर्यवंशी यांनी फळे आणि भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबतची माहिती सांगितली त्यांनी प्रत्यक्ष तसेच स्क्रीनवर सादरीकरण करून याबाबतची माहिती विशद केली . शेतीमधील उत्पादनाबाबत योग्य निर्णय घेऊन, त्यानंतर त्याचं मार्केटिंग कसे करायचे याबाबतच ज्ञान मिळवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले . ज्ञान आणि सातत्याच्या जोरावर तसेच बुद्धी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून, निश्चित यश मिळते असे त्यांनी सांगितले..
त्यानंतर कोल्हापुरातील नागदेववाडी इथले प्रगतशील शेतकरी आणि कृषीतज्ञ प्रताप चिपळूणकर यांनी शेतीच्या सुपीकतेविषयीची माहिती सांगितली . शेत जमीनीच्या अतिवापरामुळ जमिनीतील सेंद्रिय कर्ब संपून जातो . त्यामुळ पिकांना शेतामध्ये नैसर्गिक पदार्थ तसंच मुळांची जाळी आणि तण, यापासून नैसर्गिक खतांची निर्मिती होते . या सेंद्रिय तसच नैसर्गिक खतामुळ पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होते असे सांगितले.
यावेळी ए . बी . एस . कंपनीचे डॉक्टर अमोल येडे यांनी दुग्ध व्यवसायामध्ये असणार जीनोमिक सेक्ससेल सिमेनचे महत्त्व सांगितल .गाई आणि वळू यांच्यातील गुणसुत्रांमध्ये शास्त्रज्ञांनी संशोधन केल्यामुळ मादींचं प्रमाण वाढलं जात त्यामुळ चांगल्या प्रकारच्या कालवडी तयार होऊन दूध उत्पादनामध्ये वाढ होते .त्यामुळ शेतकऱ्यांचा मोठा फायदा होतो, असे सांगितले.
जिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मार्केटिंग आणि टेक्निकल सर्विसेसचे मुख्य अधिकारी डॉक्टर परीक्षित देशमुख यांनी दुग्ध व्यवसायात जीनोमिक सेक्ससेल सीमेनचे महत्व, याविषयी मार्गदर्शन केल .सेक्ससेल सिमेनच्या वापरामुळ ९० टककयांपेक्षा जास्त गायी तसच म्हशीच्या मादींचे उत्पादन मिळत असल्याचे सांगितले.प्राध्यापक जयवंत जगताप यांनी आभार मानले , तर प्राध्यापक सुधीर सुर्यगंध यांनी सूत्रसंचलन केले.
२४ डिसेंबर २०२३
डॉ. आबासाहेब साळुंखे शाश्वत ऊस उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर तर डॉ. अशोक पिसाळ यांचे टंचाईच्या सदृश्य स्थितीत पिकांसाठी पाणी व्यवस्थापन या विषयावर
डॉ. योगेश गंगाधर यांचे वनपौष्टीक भरडधान्य उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर तर श्री. सत्यजित विजय भोसले यांचे
प्लॉस्टिकल्चर – नवयुगातील शेतक-यांचे आधुनिक साधन व्याख्याने होणार आहेत.
देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलीमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व या प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत.
सतेज कृषी पशुपक्षी प्रदर्शनात पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान, मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आली असून शेतकऱ्यांनी अजून दोन दिवस चालणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी व संयोजकांनी केले आहे.