Home Uncategorized उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ भाजपाची जोरदार निदर्शने

उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ भाजपाची जोरदार निदर्शने

0 second read
0
0
28

no images were found

उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ भाजपाची जोरदार निदर्शने

कोल्हापूर  आपल्या लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसदेच्या प्रांगणामध्ये तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती मा.जगदीप धनखड यांचा (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन केले आणि या सर्वांचे चित्रीकरण राहुल गांधी करीत होते या निंदनीय कृती बद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने बिंदू चौक याठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत कल्याण बॅनर्जी, राहूल गांधी, कॉंग्रेस सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. कल्याण बॅनर्जीच करायचं काय खाली डोक वर पाय, देशविरोधी इंडी आघाडीचा धिक्कार असो, कॉंग्रेस सरकारचा धिक्कार असो, उपराष्ट्रपतींचा अवमान नही सहेगा हिंदुस्थान, पदाची नाही जाण आहे ही वैचारिक घाण, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, ज्या व्यक्तीला देशाचा द्वितीय नागरिक, महामहीम संबोधले जाते, ज्यांना राजशिष्टाचार, विशिष्ट प्रोटोकॉल असतो अशा देशाचे उपराष्ट्रपती मा.जगदीप धनखड यांचा अवमान होणे हि घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा भाजपाच्यावतीने तीव्र निषेध करीत आहे. देशाच्या 75 वर्षांच्या इतिहासात अशाप्रकारे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचा अपमान कधीही झाला नाही. यात दुर्देवाची बाब म्हणजे या सर्वांचे चित्रीकरण खुद्द राहुल गांधी करत आहेत. कॉंग्रेसच्या हीन वृत्तीचा, खालच्या दर्जाचा विचार काँग्रेसची लोकांच्या मनामध्ये रुजलेला आहे हे या कृतीतून दिसून येते. कॉंग्रेस ने भाजपला लोकशाही विरोधी संबोधण्यापूर्वी आपला स्वत:चा इतिहास काँग्रेस सरकारने विसरता कामा नये कारण आणीबाणीसारख्या घटनांद्वारे अनेक राजकीय पक्ष आणि नागरिकांवर निर्बध लादले गेले. सध्याचे कॉंग्रेसचे सर्वच नेते सत्तेस नसल्याने वैफल्यग्रस्त झाले असून त्यातूनच अशा पद्धतीचे कृत्य करताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडी सत्तेस असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे, कलाकार केतकी चितळे यासारख्या अनेकांना सरकारच्या विरोधात बोलल्यावर अटक करण्यात आली होती यातून कॉंग्रेसचा खुनशी राजकारणाचा चेहरा दिसून येतो. त्याचबरोबर पुन्हा एकदा २०२४ मध्ये माननीय नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होणार आहेत त्यामुळे काहीतरी करायचं आणि सगळ्या देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं अशी जी प्रवृत्ती फोफावत चाललेली आहे ती खऱ्या अर्थाने वाईट आहे.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांनी काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, राहूल गांधी यांच्या विचारांची यांच्या मानसिकतेची कीव येत असल्याचे सांगत या निंदनीय घटनेबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
यावेळी सरचिटणीस डॉ. सदानंद राजवर्धन, हेमंत आराध्ये, भरत काळे, अतुल चव्हाण, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, गिरीश साळोखे, अनिल कामत, संतोष माळी, हर्षद कुंभोजकर, सचिन तोडकर, दिलीप मेत्रानी, अमोल पालोजी, अशोक लोहार, विजय गायकवाड, किसन खोत, सुनील पाटील, सचिन सुतार, सचिन पवार, अवधूत भाटे, दिलीप बोंद्रे, विजय अग्रवाल, सुरेश गुजर, सुभाष माळी, वीरेंद्र मोहिते, अक्षय साळोखे, पारस पालीचा, गोविंद पांडया, प्रभाकर मालेकर, संतोष डोंगरकर, बंडोपंत सरनाईक, कपिल कदम यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…