Home शासकीय संकल्प यात्रेत आलेला पात्र लाभार्थी रिकाम्या हाताने परत जाऊ नये –  राहुल रेखावार

संकल्प यात्रेत आलेला पात्र लाभार्थी रिकाम्या हाताने परत जाऊ नये –  राहुल रेखावार

3 second read
0
0
22

no images were found

संकल्प यात्रेत आलेला पात्र लाभार्थी रिकाम्या हाताने परत जाऊ नये –  राहुल रेखावार

 

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली लक्षित लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन सर्व देशात केले जात आहे. याच अनुषंगाने कंदलगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील लाभार्थी नागरीक, शेतकरी महिला व पुरुष यांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहभाग पहायला मिळाला. कंदलगाव येथे उभारण्यात आलेल्या विविध योजनांच्या स्टॉल्स मधून गावातील १२७६ नागरिकांना लाभ दिला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संकल्प यात्रेत येणारा प्रत्येक नागरिक पात्र लाभार्थी रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका अशा सूचना प्रशासन व गावस्तरीय यंत्रणेला दिल्या. गावागावात संकल्प यात्रेचे आयोजन करत असताना गावातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देऊया, यासाठी लोकप्रतिनिधींनी यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन प्रशासनासोबत प्रत्येक घराघरात हा संदेश देणे गरजेचे आहे. शासनाच्या सर्व योजना आपल्या गावात संकल्प यात्रे मार्फत सहज मिळत आहेत. यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही. नागरिकांचे प्रश्न, अडचणी या संकल्प यात्रेच्या निमित्तानेही सोडवल्या जात आहेत. कंदलगाव येथे लोकांच्या उत्साहातून, प्रशासनाच्या मदतीने एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याचा आनंद सर्वांनाच आहे. संकल्प यात्रेमध्ये येणारा पात्र लाभार्थी आवश्यक योजनेच्या लाभासह इतरही योजनांची माहिती घेऊन जाईल याची मला खात्री आहे असे ते पुढे म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, माजी आमदार अमल महाडिक, सरपंच राहूल पाटील, उपसरपंच सतीश निर्मल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, उप विभागीय अधिकारी हरीश धार्मिक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, तहसिलदार स्वप्निल रावडे, गट विकास अधिकारी विजय यादव उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला संकल्प यात्रेच्या प्रसिद्धी रथाला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. दीपप्रज्वलनाने तसेच राष्ट्रगीत व राज्यगीत गावून संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. सरपंच राहूल पाटील व सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद कोल्हापूर संतोष पाटील यांनी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने विविध लाभासाठी नोंदणी होत आहे तसेच काही योजनांचे लाभही नागरिक घेऊन जात असल्याचे सांगितले. ते म्हणाले, जीवन सुसह्य करण्यासाठी, जीवनात परिवर्तन आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी शासन स्तरावरून होत असते. यासाठीच योजना गरजूंना देण्यासाठी शासनाकडून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले जात आहे. लाभ देताना कोणत्या अडचणी येतात, लाभ दिल्यावर त्याचे काय चांगले परिणाम होतात, राहिलेले पात्र लाभार्थी शोधणे हा शासनाचा संकल्प यात्रेतील प्रामाणिक प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. कंदलगाव येथील कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नागरिक व ग्रामस्थ यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे
यावेळी आभारही त्यांनी मानले.
माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आवश्यक सर्व योजना या संकल्प यात्रेतून गरजूंना दिल्या जात आहेत. नागरीक व प्रशासन यांनी मिळून जर ही मोहीम यशस्वी राबविली तर कोणीही लाभार्थी शिल्लक राहणार नाही. गावात सहाशे हून अधिक लाभार्थी दोन दिवसात मिळाले, आज हजारो नागरिक या ठिकाणी लाभ घेत आहेत, अजून काम सुरू आहे. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले. ते म्हणाले, गावातील सर्व नागरिक व प्रशासनाने मिळून एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले. शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, पाटगाव मधील गावस्तरीय उद्योग व्यवसायाची भरारी, बँकेच्या विविध योजना, महिलांसाठी काम करणारे उमेद, जलजीवन मिशन अशा अनेक योजनांच्या स्टॉल्स मधून लोकांना माहितीसह योजनांचा लाभ दिला जात आहे. यांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ही मोहीम पुढे २६ जानेवारी पर्यंत सुरू असणार आहे. बाकी उर्वरित पात्र लाभार्थीही येत्या काळात लाभ देऊन पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे आभार विस्तार अधिकारी श्री.भोईटे यांनी मानले.

हर घर जल योजने अंतर्गत कंदलगावला शंभर टक्के नळ जोडणी साठी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत कर्मवीर प्रभाग संघ पाचगाव यांना धनादेश वितरित करण्यात आला. यासह पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, किसान क्रेडिट कार्ड, जनधन योजना, प्रधानमंत्री विमा योजना, पोषण आहार, आयुष्यमान भारत योजना, संजय गांधी निराधार योजनातील लाभार्थींना मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, लाभ व धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कंदलगावचे सरपंच यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कंदलगाव ग्रामपंचायत मधील आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी २५२८ उद्दिष्ट होते. यातील स्थलांतरित, मयत, लग्न झालेले, आधार लिंक नाही असे ३२१ जण निघाले. दि.११ डिसेंबर पूर्वी झालेले काम ५४९ होते. दि.११ ते १८ डिसेंबर दरम्यान विशेष अभियान राबवून काढलेली गोल्डन कार्ड संख्या १६५८ आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या यंत्रणेने केलेले काम उल्लेखनीय होते. केलेल्या कामाबाबत यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते विभागाचा सन्मानही करण्यात आला. विकसित भारत संकल्प यात्रेत कंदलगाव येथे योजना निहाय वितरित केलेले लाभ- सार्वजनिक आरोग्य विभाग नेत्र तपासणी व माहिती-110, सार्वजनिक आरोग्य विभाग (गोल्डन कार्ड) 83, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती विभाग 10, उन्नत महिला ग्रामसंघ बचत गट 50, महिला बचत गट व नारीशक्ती बचत गट 30, प्रधानमंत्री आवास योजना 74, जल जीवन मिशन पाणी प्रकल्प- 42, तहसिल कार्यालय योजना व पुरवठा विभाग 24, उज्वला गॅस 17, महसूल विभाग 23, निवडणूक कक्ष 55, जिल्हा ग्रामीण बँक 250, खादी व ग्रामोद्योग 68, स्वामित्व योजना भुमी अभिलेख 57, प्रधानमंत्री पोषण अभियान 70, महाराष्ट्र राज्य शासकीय कृषी विभाग 70, जिल्हा कृषी विभाग 4, कौशल्य विकास रोजगार 54, जिल्हा समाज कल्याण 51, सहायक आयुक्त समाज कल्याण 27 व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद 77 असे एकूण 1276 योजनांचा लाभ किंवा नोंदणीचा लाभ घेतला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…