no images were found
जनतेच्या पाठबळामुळेच कोट्यावधींच्या निधीच्या पाठपुराव्यास यश : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर(प्रतिनिधी) : आपणाला कोल्हापूर शहरवासियांनी मनापासून साथ दिली आहे. निवडणुकीत जय- पराजय होतच राहतात. पण नागरिकांना न्याय देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना अभिप्रेत शिवसेनेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी कोल्हापूर वासियांनी दिली आहे. जनतेच्या पाठबळामुळेच कोल्हापूर शहरवासियांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधी मंजुरी पाठपुराव्यास यश प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून को.म.न.पा.प्र.क्र.३४ शिवाजी उद्यमनगर अंतर्गत मिरजकर तिकटी दुधकट्टा ते खासबाग चौक ते छत्रपती शिवाजी स्टेडियम जुने प्रवेशद्वार या कामास रु.८ लाख १४ हजार आणि को.म.न.पा.प्र.क्र.४५ कैलासगडची स्वारी अंतर्गत शारदा पॅसेज ड्रेनेज लाईन करणे या कामास रु.८ लाख १७ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामांचा शुभारंभ आज भागातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. उद्घाटनाच्या सुरवातीस मंगळवार पेठ परिसरातील जेष्ठ नागरिकांनी गेले चार वर्षात दुर्लक्षित झालेल्या कामांना निधी देवून चांगल्या दर्जाची विकास कामे करून घेतल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे लोकाभिमुख व लोककल्याणकारी कामकाज सुरु आहे. आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात कोट्यावधींचा निधी कोल्हापूर शहराला प्राप्त झाला आहे. जनतेने साथ दिल्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यास यश प्राप्त झाले आहे. यातून जनसामान्यांच्या हिताची कामे सुरु आहेत. गेले चार वर्षात दुर्लक्षित झालेल्या कामांना निधी मिळून चांगल्या दर्जाची विकास कामे होत असल्याने नागरिकांमधून व्यक्त होणारे समाधान हीच आपल्या कामाची पोचपावती असून, येणाऱ्या काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक अशोक पोवार, शिवसेना उपशहरप्रमुख सचिन पाटील, उपशहरप्रमुख राजू पाटील, उपशहरप्रमुख रणजीत मंडलिक, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, गौरी माळतकर, विभागप्रमुख श्रीकांत मंडलिक, नितिन माळी, राहूल घोटणे, संजय शिंदे चानी, दिलीप साळोखे, दिपक विचारे, राजू सुतार, संभाजी घाटगे, विजय दरवान, रोहित भोसले, भगवान माळी, पिकू साळोखे, अनिल देवणे, राजू साळोखे, गुंडोपंत फाटक, चॉद महालकरी, बाबासो मुळे, दत्तात्रय माळी, सुधाकर पोवार, सचिन रसाळ, आबा माळी, प्रकाश मराठे, प्रशांत पोवार, सुहास भोला, रणजीत सासणे यांच्यासह भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.