
no images were found
डेक्कन स्पोर्ट्स क्लब तर्फे बर्गमॅन ११३ ट्रॉएथलॉन,डुएथलॉन या स्पर्धा संपन्न
कोल्हापूर/ प्रतिनिधी : डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील बर्गमॅन ११३ ट्रॉएथलॉन,दुयेथलॉन या स्पर्धेचे आयोजन येथील राजाराम तलाव परिसरात करण्यात आले होते.यामध्ये स्विमिंग – १.९ किलोमीटर, सायकलिंग – ९० किलोमीटर आणि रनिंग – २१ किलोमीटर या स्पर्धा झाल्या. देश विदेशातील ६५० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.या स्पर्धेमध्ये ट्रॉएथलॉन ही स्पर्धा तीन प्रकारांमध्ये झाली. सकाळी ६ वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धा दुपारी ४ वाजेपर्यंत तीन ते साडेआठ तास अशा कालावधीत झाल्या स्पर्धा १८ ते ३०,३१ते ४०,४१ ते ५० व ५१ च्या पुढील सर्व अशा वयोगटात झाल्या.सकाळी ६ वाजता डुएथलॉन ,६.१५ वाजता ऑलिंपिक डुएथलॉन,६.३० वाजता बर्गमॅन ११३ ची ट्रॉएथलॉन,६.४५ वाजता ऑलिंपिक ट्रॉएथलॉन,७.१५ वाजता इलाईट ट्रॉएथलॉन या वेळेत या विविध स्पर्धां झाल्या.सुरुवातीला छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. त्याच बरोबर स्पर्धा होतील तशा पद्धतीने स्पर्धकांना बक्षिसे ही उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी मालोजीराजे छत्रपती यांनी डेक्कन स्पोर्ट्स क्लब दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करते आता तर म्हैसूर,कझाकीस्थान येथे बर्गमॅन स्पर्धा आयोजित करणार आहेत. कोल्हापूर मध्ये त्यांनी बर्ग मॅन स्पर्धा आयोजित करून देश विदेशातील स्पर्धकांना कोल्हापूर मध्ये आणले आहे.असे सांगून या पुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी व डेक्कन स्पोर्ट्स क्लब च्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील,शिवाजी विद्यापीठ रजिस्ट्रार डॉ. व्ही.एन. शिंदे,डेप्युटी रजिस्ट्रार डॉ. वैभव ढेरे,इस्लामपूरचे डी.वाय. एस. पी मंगेश चव्हाण ,माजी नगरसेवक सत्यजित नाना कदम डॉ संदीप पाटील आदी उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्यांची नावे अशी आहेत. बर्गमॅन ओपन (पुरुष)गटात १)निहाल बेग,२))मायकेल लेनिग,३)मनोज चव्हाण बर्गवूमन ओपन (महिला) गटात १)कोरिना वाणदाम २) दिया जैन बर्गमॅन ११३ ट्रायथलॉन (पुरुष ) १६ ते ३० वयोगट १)शुभम कटारिया,२)सिद्धेश आदिवरेकर३)आशिष लाथर ३१ते ४० गटात १)मिहीर बर्वे,२)सलील पाटील,३)अविनाश कुमार ४१ ते ५० वयोगट १)भरत देवरा२)तन्मय नहार३)प्रदीप कटरोडीया,५१ च्या पुढे१)निलेश मोगलेवार२)संजय पाटील,३ अनिल देशपांडे बर्गवुमन ११३ ट्रॉएथलॉन (महिला )१६ ते ३० वयोगट१)सृष्टी शहा ३१ ते ४० वयोगट१)समृद्धी कुलकर्णी,२)प्रियांका वदरेजा३)नंदिता देवकाटे,४१ ते ५० वयोगट१)प्रीती नारयण२)गुंजन कोळी बर्गमॅन ११३ डुएथलॉन(पुरुष) १६ ते ३० वयोगट अथर्व देवकाटे, ३१ ते ४० वयोगट १)राहुल घाटगे२)अमोल तांबे ३)नवरंग पाटील,४१ते ५० वयोगट १)कार्तिक आयर२)सुजित ईदलाबादकर,५१ च्या पुढे सुधीर कदम बर्गवुमन ११३ डुएथलॉन(महिला) ३१ ते ४० रमय्या नायर ४१ ते ५० लामा रवीचंदर
बर्गमॅन ऑलिम्पिक डुएथलॉन(पुरुष) गटात १६ ते ३० १)सार्थक जमदग्नी,२)अक्षय पंडित,३)श्रेयश मोगल ३१ ते ४० वयोगट १)सुखजित सिंग २)महेश चकोर ४१ ते ५० वयोगट १)नितीन मुळे २)शंभो भट्टाचर्जिं,३)मंदार भिडे ५१ च्या पुढे वयोगट १)मनोज नंदवाना,२)संदीप कोरगावकर३)अमोध मोघे बर्गवुमन ऑलिम्पिक डुएथलॉन (महिला) १६ ते ३० वयोगट १)काजल मुर्या२)बांसरी गोसालीय३१ ते ४० वयोगट १)विषु धामा२)इतु सिंग ४१ ते ५० वयोगट योगिनी धुमाळ बर्गमॅन ऑलिम्पिक ट्रॉएथलॉन (पुरुष)१६ ते ३० वयोगट १)हार्दिक सावंत२)हर्षवर्धन बाबर३)वीरेंद्र मोहिते ३१ ते ४० वयोगट १)आकाश खत्री२)केतन ताडसारे,३)समरजित जाधव ४१ ते ५० वयोगट १)निकोलस मॅकरेगर,२)निल आशय३)सचिन वाकाडकर ५१ च्या पुढे १)महादेव घुगे,२)महेश महादेव ३) आशिष सांडू बर्गवुमन ऑलिम्पिक ट्रॉएथलॉन (महिला)१६ ते ३० वयोगट१)अनन्या उपाध्यय२)कोहिनुर दारदा,३)रितू मालानी,३१ ते ४० १)आयेशा मानसुकानी २)अमृता सोनसाले ३)ऋतुजा अचलपुरे,४१ ते ५० वयोगट १)नुपूर शेट्टी२)अर्चना वाघ३)देवयानी सिंग ५१ च्या पुढे वयोगट१)प्रतिभा वानखडे २) अंजना जग्गी.
या स्पर्धेसाठी वैभव बेळगावकर व उदय पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.जवळजवळ २५० व्हॉलीटीयर यांनी परिश्रम घेतले.स्पर्धकांना स्पर्धा मार्गावर पाणी,सरबत व कलिंगड व थंडगार पेय पुरविण्यात आली.सर्व स्पर्धकांना डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण देऊन मोलाचे सहकार्य केले गेले.या स्पर्धेचे आयोजन जयेश कदम,राजीव लिंग्रज,उदय पाटील,वैभव बेळगावकर, संजय चव्हाण,अभिषेक मोहिते,समीर चौगुले,मनीष सूर्यवंशी,डॉ.समीर नागटिळक,प्रशांत काटे यांनी केले होते. स्पर्धेच्या ठिकाणी केवळ सहभागी स्पर्धकांनाच प्रवेश हा होता.सूत्रसंचालन प्रियांका राऊत यांनी केले.कोल्हापूर पोलीस आणि रॉयल रायडर्स ग्रुप कोल्हापूर यांच्या वतीने रस्त्यावरील वाहतूकिवर नियंत्रण ठेवले.कोल्हापूर पोलीस,कागल पोलीस,गांधीनगर व गोकुळ शिरगाव,फाईव्ह स्टार एम.आय.डी.सी,मॅक असोसिएशन,हायवे व कोल्हापूर ट्रॅफिक यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
बर्गमॅन शीर्षकाचा मूळ अर्थ असा आहे –
बर्गमॅन हा जर्मन शब्द आहे ज्याचा अर्थ ‘माउंटन मॅन’ असा होतो. प्राचीन काळी जे पुरुष पर्वत रांगांवर राहायचे त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पर्वत ओलांडण्याचे कठीण काम पार पाडण्याचे आव्हान पेलावे लागत असे, शेवटी ते पर्वत चढण्यात प्रवीण होते. या दैनंदिन कामामुळे ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही खूप मजबूत झाले. आमचे ट्रायथलॉन इव्हेंट्स ही मानसिक आणि शारीरिक ताकदीची अधिक परीक्षा असल्याने, डेक्कन स्पोर्टस क्लब संघाने बर्गमॅन या शब्दापासून साधर्म्य आणण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचा अर्थ असा आहे. सशक्त मनुष्य, आणि म्हणून त्याला असे वाटले की “डोंगराळ” कार्य पूर्ण करण्यासाठी, प्रत्येक इव्हेंटमध्ये फिनिशरला दिले जाणे योग्य आहे..