
no images were found
स्कोडा ऑटो इंडिया २०२४ मध्ये किमतीत २ टक्क्यांची वाढ करणार
कोल्हापूर : स्कोडा ऑटो इंडियाने १ जानेवारी २०२४ पासून त्यांच्या वाहनांच्या किमतींमध्ये जवळपास २ टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. किमतीमधील ही वाढ स्कोडा ऑटो इंडिया वेईकल्सच्या संपूर्ण श्रेणीवर लागू असेल. या श्रेणीमध्ये कुशक एसयूव्ही, स्लाव्हिया सेदान आणि कोडियक लक्झरी ४x४ या कार्सचा समावेश आहे. पुरवठा, इनपुट व कार्यसंचालन खर्चांमध्ये वाढ झाल्याने किमतींमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.
स्कोडा ऑटो इंडियाने जुलै २०२१ मध्ये भारतासाठी विशेषरित्या विकसित करण्यात आलेली ऑल-न्यू एमक्यूबी-एओ-इन प्लॅटफॉर्मवर आधारित नवीन कुशक लाँच केली. तसेच एप्रिल २०२२ मध्ये याच प्लॅटफॉर्मवर आधारित स्लाव्हिया सेदान लाँच केली. दोन्ही कार्स आता जीसीसी व राइट हँड ड्राइव्ह केल्या जाणाऱ्या बाजारपेठांमध्ये निर्यात केल्या जातात आणि २०२४ मध्ये कंपनीच्या व्हिएतनाम मधील प्रवेशाचे नेतृत्व करणार आहेत.
कुशक आणि स्लाव्हिया यांना ग्लोबल एनसीएपीच्या नवीन, शिस्तबद्ध क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल्स अंतर्गत प्रौढ व्यक्ती व मुलांसाठी संपूर्ण ५-स्टार्स मिळाले आहेत. कोडियकला युरो एनसीएपी अंतर्गत प्रौढ व्यक्ती व मुलांसाठी ५-स्टार्स असण्यासह स्कोडा ऑटो इंडियाचा ५-स्टार रेटिंग प्राप्त, क्रॅश-टेस्टेड कार्सचा १०० टक्के ताफा आहे.
कंपनीने २०२१ मध्ये १२० ग्राहक टचपॉइण्ट्सवरून २०२३ च्या अखेरपर्यंत २५० हून अधिक ग्राहक टचपॉइण्ट्सपर्यंत वाढ करत आपला नेटवर्क देखील विस्तारित केले आहे. आपल्या ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनाशी बांधील राहत स्कोडा ग्राहकांपर्यंतच्या आपल्या पोहोचमध्ये वाढ करेल आणि दर्जात्मक उत्पादनांची श्रेणी प्रदान करेल.