no images were found
महापालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दि.15 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यानंतर महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावित असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते शाल, साडीचोळी देऊन सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उल्लेखनीय काम केलेल्या आरोग्य, पाणी पुरवठा, घरफाळा व अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिकेच्या शाळा, केएमसी कॉलेज व खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या किशोरवयीन मुलींसाठी किशोरी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा शुक्रवार, दि.15 डिसेंबर 2023 रोजी यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज हॉल येथे सकाळी 10 वाजता घेण्यात येणार आहे.
महिला बचत गटांनी बनविलेल्या विविध खाद्यपदार्थांचा खाद्य महोत्सव
महिला व बालकल्याण विभाग आणि दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामार्फत महिला बचत गटांनी बनविलेल्या विविध खाद्यपदार्थांचा खाद्य महोत्सव ताराबाई पार्क येथील सासने ग्राऊंडवर आयोजित करण्यात आला आहे. हा खाद्य महोत्सव दि.15 ते 17 डिसेंबर 2023 अखेर सायंकाळी 5.30 ते 9.30 या वेळेत भरविण्यात येणार आहे. तरी याचा सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.