Home सामाजिक महिंद्रातर्फे EXCON 2023 मध्ये अत्याधुनिक BLAZO X m-DURA टिपर आणि BSV रेंज ऑफ कंस्ट्रक्शन इक्विपमेंट सादर

महिंद्रातर्फे EXCON 2023 मध्ये अत्याधुनिक BLAZO X m-DURA टिपर आणि BSV रेंज ऑफ कंस्ट्रक्शन इक्विपमेंट सादर

1 min read
0
0
23

no images were found

महिंद्रातर्फे EXCON 2023 मध्ये अत्याधुनिक BLAZO X m-DURA टिपर आणि BSV रेंज ऑफ कंस्ट्रक्शन इक्विपमेंट सादर

 

 

बंगळुरू : नाविन्यपूर्णता आणि विश्वासार्हतेबद्दलची आपली बांधिलकी दर्शवत महिंद्रा समूहाचा एक भाग महिंद्राचा ट्रक आणि बस विभाग (MTBD), आणि बांधकाम उपकरणे विभाग (MCE) यांनी EXCON 2023 मध्ये त्यांच्या नवीनतम ऑफरिंग सादर केल्या. “नया इंडिया का नया टिपर” महिंद्रा BLAZO X m-DURA आणि बांधकाम उपकरणे त्यांच्या संबंधित नवीन CEV5 श्रेणी आपापल्या संबंधित श्रेणींमध्ये मानके पुन्हा परिभाषित करण्यासाठी प्रगत वैशिष्ट्ये आणि नवीन उद्योग नियमांचे पालन करत सज्ज आहेत.

बंगळुरू इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर (BIEC) येथील MTB स्टॉल OD67 वर, महिंद्राच्या रोडमास्टर आणि अर्थमास्टर सारख्या BSV बांधकाम उपकरणांची संपूर्ण श्रेणी, तसेच BLAZO X m-DURA 35 Tipper, BLAZO X 28 ट्रान्झिट मिक्सर, FURIO 10 फ्यूएल बाउझर सारखी विस्तृत ट्रक श्रेणी 6KL आणि लोडकिंग OPTIMO टिपरसह प्रदर्शनात होते. महिंद्राने नवीन संकल्पना लिफ्टमास्टर कॉम्पॅक्ट क्रेनचेही प्रात्यक्षिक केले. त्यामध्ये लोडिंग आणि हाऊलिंग क्षमतेचा समावेश असून त्याचा उद्देश बांधकाम गरजांसाठी एक विविधांगी उपाय पुरविणे आहे.

यावेळी बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या व्यावसायिक वाहने विभागाचे व्यवसाय प्रमुख श्री.  जलज गुप्ता म्हणाले, “स्थानिक उत्पादनावर भर देण्याबरोबरच अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञान सादर करण्याचे आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न, कंपनीच्या मेक इन इंडिया उपक्रमाला असलेल्या भक्कम पाठबळाचे उदाहरण आहे. EXCON येथे Blazo X m-Dura Tipper आणि नवीन CEV5 श्रेणीच्या बांधकाम उपकरणांची ओळख, महिंद्राची व्यावसायिक वाहन आणि बांधकाम उपकरणे विभागाप्रती असलेल्या बांधिलकीची पुष्टी करते आणि कंपनी नाविन्यपूर्णता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन या मार्गाने पुढे जाण्यास तयार आहे. m-DURA टिपर हे सिद्ध आणि मजबूत साधनांसह आमच्या ग्राहकांमध्ये सर्वात विश्वासार्ह भागीदार बनण्यासाठी तयार आहे तर नवीन CEV5 श्रेणी ही सरकारने परिभाषित केलेल्या वेळेपूर्वी ज्यांनी ही उत्पादने तयार केली त्या आमच्या अभियंत्यांच्या परिश्रमाचे फलित आहे.”

महिंद्रा सारथी अभियानासारख्या ग्राहक कल्याण कार्यक्रमांचे उद्दिष्ट १०,००० रुपये थेट बँकेत ट्रान्सफर आणि या कामगिरीची दखल म्हणून प्रमाणपत्र याद्वारे ट्रक चालकाच्या मुलींसाठी ११०० शिष्यवृत्ती प्रदान करणे आहे.

MTBD चे सेवा नेटवर्क ८० 3S डीलरशिप आणि २९०० हून अधिक रोडसाइड असिस्टन्स सर्व्हिस पॉईंट्स आणि संपूर्ण भारतातील प्रमुख ट्रकिंग मार्गांवर १६०० हून अधिक रिटेल आउटलेट्सच्या स्पेअर्स नेटवर्कसह ४०० हून अधिक टच पॉइंट्सपर्यंत विस्तारले आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…