
no images were found
भारतीय भाषा हे एकतेचे प्रतीक- कुलसचिव शिंदे
कोल्हापूर(प्रतिनिधी): भारतीय भाषा हे एकतेचे प्रतीक असे प्रतीपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. भारतीय भाषा उत्सव (28 सप्टें ते 11 डिसेंबर ) व भारतीय भाषा दिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भवन येथे मराठी व हिंदी अधिविभागाच्यावतीने आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारत विविधतेने नटलेला देश आहे. येथे सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक एकता नांदते. भाषेमुळे भारत एकसंघ आहे. देशाची एकसंघता टिकविण्यासाठी सर्व भाषांना आपलंसं केले पाहिजे. याच धर्तीवर भारतीय भाषांचा उत्सव साजरा करून सर्व एकसंध होऊया. असे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्य़ांनी विविध भाषांमधून करिअरची नावे दारे उघडून भाषा सेवक बनण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. आभार हिंदी विभागाचे प्रभारी डॉ. ए. एम. सरवदे यांनी मांडले. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले. यानंतर भारतीय भाषा उत्सव सांस्कतिक कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय भाषा उत्सवाच्या निमित्ताने निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये प्रथमः मोनिका कुंभार (वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव), द्वितीयः साक्षी शिर्के (डी.आर माने महाविद्यालय, कागल), तृतीयः प्रतिभा दुंडगे (देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर), उत्तेजनार्थः निकीता मोहिते (एस. जी. एम, कराड) व अमृत जोगम
(विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर ) या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देउन गौरविण्यात आले.
यावेळी डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ. प्रकाश दुकळे, डॉ. नीला जोशी तसेच शिवाजी विद्यापीठातील विविध विभागाती प्राध्यापक, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.