Home शासकीय पनवेल महानगरपालिकेची कोल्हापूर केंद्रावरील परीक्षा सुरळीत पार पडली

पनवेल महानगरपालिकेची कोल्हापूर केंद्रावरील परीक्षा सुरळीत पार पडली

6 second read
0
0
22

no images were found

पनवेल महानगरपालिकेची कोल्हापूर केंद्रावरील परीक्षा सुरळीत पार पडली

 

 

कोल्हापूर : पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट “अ” ते गट “ड” मधील ४१ संवर्गातील ३७७ पदांकरीता राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर एकूण ५५ हजार २१४ उमेदवार परीक्षा देत असून परीक्षा टि.सी.एस. कंपनी मार्फत घेण्यात आली असल्याची माहिती पनवेल महानगरपालिका पदभरतीचे जिल्हा समन्वयक नागेंद्र मुतकेकर यांनी दिली आहे.

 कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन आणि रिसर्च कोल्हापूर व आयऑन डिजिटल झोन आयडीझेड शिये या दोन केंद्रावर दि. 8 ते 11 डिसेंबर 2023 पर्यंत अनुक्रमे 1, २ व ३ सत्रामध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पहिले सत्र स. ९ ते ११ दुसरे सत्र दु. १ ते ३ व तिसरे सत्र सायं. ५ ते ७ अशा स्वरुपात परीक्षा पार पडली. परीक्षेमध्ये संपूर्ण परीक्षा कालावधीत एकूण 2 हजार 073 उमेदवारांनी सहभाग घेतला.

परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अधिकारी, एक लिपीक व एक शिपाई नियुक्त करण्यात आला होता. तसेच परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता या केंद्रावर दोन पुरुष कॉन्स्टेबल व दोन महिला कॉन्स्टेबल असे एकूण ४ पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा तसेच मोबाईलचा वापर करु नये यासाठी शासनमान्यता प्राप्त मे. ई.सी.आय.एल (ECIL) या कंपनीचे प्रत्येक परीक्षा केंद्रावर जॅमर बसविण्यात आले होते. परीक्षेकरीता पनवेल महानगरपालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अपार मेहनत घेतली असून त्यास पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले आहे आणि त्यामुळेच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही व परीक्षा निर्विघ्नपणे पार पडली, अशी माहितीही श्री. मुतकेकर यांनी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…