no images were found
प्रा. आर. जी. सोनकवडेनी स्वीकारला विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुखाचा कार्यभार
कोल्हापूर (प्रतिनिधी): आज प्रा आर. जी. सोनकवडे यांनी शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांना माजी विभागप्रमुख प्रा. के. वाय. राजपुरे, विभागातील प्राध्यापक मंडळी, आजी माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. भौतिकशास्त्र विभाग हा विद्यापीठातील संशोधन आणि प्रशासनामध्ये अग्रगण्य विभाग आहे. आत्तापर्यंतचा विभागाचा गौरव आणि कीर्ती याला साजेसे काम त्यांच्याकडून व्हावे आणि विभागाची प्रतिष्ठा अजून वाढावी अशा अपेक्षा त्यांच्याकडून करण्यात आल्या. याआधीच्या त्यांच्या केंद्रीय विद्यापीठ, इन्स्टिटयूट ऑफ नॅशनल इम्पोर्टन्स, आणि राज्य विद्यापीठातील कामाचा अनुभवाचा फायदा विभागाला आणि विद्यापीठाला चांगला होईल असे मत सर्वांनी व्यक्त केले. याआधी विद्यापीठातील सैफ-सीएफसी विभागातील त्यांच्या उत्कृष्ठ कामामुळे सीएफसी सोबत ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू मा. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू मा. पी. एस. पाटील आणि कुलसचिव मा. व्ही. एन. शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळेच ते शक्य झाले आणि आत्ताही त्यांच्याकडून असाच पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा प्रा. सोनकवडेंनी व्यक्त केली.भारत सरकारच्या संशोधन प्रकल्पासाठी अनुदान देणाऱ्या संस्थाकडून भरघोस निधी-अनुदान मिळवण्यासाठी त्यानी वेळोवेळी घेतलेला पाठपुरावा निश्चितच उल्लेखनीय आहे आणि त्याचा फायदा पुढील काळात विभागाला तसेच विद्यापीठाला होईल. ते वेळोवेळी निधी पुरवणाऱ्या संस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आले आहेत. निधी पुरवणाऱ्या संस्थांशी असलेल्या त्यांच्या संपर्काचा जास्तीत जास्त फायदा विभागातील संशोधनाला करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे ते म्हणाले. सैफ-सीएफसी विभागाप्रमाणेच भौतिकशास्त्र विभागालाही अशा प्रकारे निधी उपलब्ध होईल अशी अशा त्यांनी व्यक्त केली. विभागातील पीआईएफसी मधील सर्व उपकारणे लवकरात लवकर सुस्थितीत आणणे आणि ती आई स्टेम या डीएसटी च्या पोर्टल ला ऑनलाईन पद्धतीने जोडून उपकारणांचा महसूल वाढवणे याकडे त्यांचे विशेष लक्ष राहील. तसेच आत्तापर्यन्त विभागातील सर्व प्राध्यापक मंडळी आणि विभागप्रमुखांनी विद्यापीठाला जी प्रतिष्ठा मिळवून दिली ती टिकवण्याचा आणि आणि ती वृद्धिंगत करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन अशी ग्वाही प्रा. सोनकवडेंनी दिली. कोरिया, जर्मनी, ओक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, लंडन आणि ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटी सारख्या ठिकाणी संशोधन करणाऱ्या विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रा. सोनकवडेंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी विभागातील आजी माजी विध्यार्थ्यांना विभागात सुधारणेसाठी त्यांच्याकडून सूचना सुचवण्याचे आवाहन केले.