no images were found
डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाला नॅकचे ‘ ए प्लस ‘ मानांकन
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : येथील डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाला नॅकचे ए प्लस मानांकन जाहीर झाले आहे. नॅककडून विद्यापीठाला 3.48 सीजीपीए गुण मिळाले आहेत. या श्रेणीमुळे विद्यापीठाच्या उत्कृष्टतेवर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.
यावेळी डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, आयक्यूएसी समन्वयक डॉ. राकेश कुमार शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रीडेशन कौन्सिल अर्थात ‘नॅक’च्या टीमने ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला भेट दिली. मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, सेंटर फॉर इंटर डिसिप्लेनरी स्टडीज, स्कूल ऑफ हॉस्पिटलिटी, नर्सिंग कॉलेज, फिजओथेरपी कॉलेज, स्कूल ऑफ अलाइड हेल्थ सायन्स, फार्मसी कॉलेज आदी संस्थाना समिती सदस्यांनी भेट दिली. विद्यापीठाकडून पुरवल्या जाणाऱ्या सर्व सोयी सुविधा, व्यवस्था, रचना, रिझल्ट, अभ्यासक्रम, कॅम्पस प्लेसमेंट, प्राध्यापकांची संख्या, दर्जा यांची पाहणी करण्यात आली. या नुसार हे मानांकन जाहीर केले.
‘एनआयआरएफ- 2023’ च्या क्रमवारीत विद्यापीठाने देशातील आघाडीच्या दीडशे शैक्षणिक संस्थांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. यापूर्वी दोन वेळा विद्यापीठाला ‘नॅक-ए’ मानांकन मिळाले होते.
विद्यापीठाचे कुलपती डॉ संजय डी. पाटील यानी या मानाकनाबद्दल सर्व सहकाऱ्याचे अभिनंदन केले आहे. सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून विद्यापीठाला हे मानांकन मिळाले आहे. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाबरोबर आधुनिक सोयी सुविधा पुरवल्या जातात. यापुढील काळात विद्यापीठाचा नावलौकिक आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करू. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू, असे त्यानी सांगितले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, वेळोवेळी ग्रुप ने प्रगती केली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अनेक शिखरे सर करताना मिळालेले हे ए प्लस मानांकन अधिक चांगले काम करायला प्रेरित करणारे आहे. सध्या 3 हजार असणारी विद्यार्थी संख्या 10 हजार पर्यंत होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. ही सुरुवात असून प्रत्येकाच्या सहकार्याने अधिक चांगले काम करू असे सांगितले.
कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल म्हणाले, उत्कृष्टतेचा ध्यास घेउन विद्यापीठ व सर्व सहकारी कार्यरत असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेच्या विश्वस्त वैजयंती संजय पाटील, राजश्री काकडे,वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, करण काकडे, डॉ. के. प्रथापण, डॉ. ए. के. गुप्ता, रॉबिन अल्मेडा (लंडन), डॉ. अभय जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. आशालता पाटील, डॉ. सी. डी. लोखंडे, जानकी शिंदे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. अमृतकुंवर रायजादे, रुधीर बार्देसकर, डॉ. अजित पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ अर्पिता पांडे तिवारी यांनी केले. डॉ शिंपा शर्मा यांनी प्रास्ताविक केले तर आभार डॉ राकेश कुमार शर्मा यांनी मानले.