no images were found
महिलांनी समाजकार्यासाठी पुढे यावे :- खा. महाडिक
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) :भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यामध्ये आज महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला मोर्चाची जंबो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल कार्यकारणी अशा जवळपास 400 हुन अधिक महिलांना खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, भारतमाता पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारणी सदस्य राहुल चिकोडे, उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित नाना कदम, माजी महापौर दीपक जाधव, संदीप देसाई, जिल्हा चिटणीस संगीता खाडे, माधुरी नकाते, उमा इंगळे, धनश्री तोडकर यांच्यासह प्रनोती पाटील, तेजस्वी पार्टे, विद्या बनछोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर आपल्या प्रस्ताविकामध्ये त्यांनी जिल्हा आणि मंडल कार्यकारिणीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांचे संघटन करण्याचा उद्देश असून या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या विविध कल्याणकारी योजना, बूथ स्तरीय कामे करण्यासाठी महिला मोर्चा कटीबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले सर्वप्रथम कार्यक्रमाला असणारा महिलांचा प्रतिसाद आणि उत्साह बघून उपस्थित सर्व महिलांचे अभिनंदन आणि स्वागत केले . पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. नारीशक्ती, नारी सन्मान या भावनेतून महिलांना सर्वच क्षेत्रांमध्ये काम करण्याची समान संधी त्यांच्यामुळे प्राप्त झाली आहे. नुकतेच त्यांनी संसदेत महिला विधेयक पारित करून महिलांना देखील राजकारणात समान संधी प्राप्त करून दिली आहे त्यामुळे प्रत्येक महिलेने प्रेरित होऊन आपल्या कार्यक्षमता ओळखून समाजकार्यासाठी संघटित व्हावे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपा महिला मोर्चाच्या 7 महिला मंडल अध्यक्षा पुढीलप्रमाणे क.बावडा अश्विनी राऊत, शाहूपुरी शितल देसाई, लक्ष्मीपुरी सविता दिवसे, राजरामपुरी असिया सनदी, मंगळवार पेठ संपदा मुळेकर, शिवाजी पेठ स्मिता खाडे याप्रसंगी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.