no images were found
शहरातील ९ कोटी ७५ लाखाच्या विविध विकास कामांना प्रशासका ची मंजूरी
कोल्हापूर : शहरामध्ये विविध विकास योजेनमधून 9 कोटी 75 लाखांच्या विविध विकास कामांना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी मान्यता दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, गटर्स, चॅनल, क्रॉक्रीट रस्ते, फुटबॉल स्ट्रीट लाईट विकसीत करणे, श्री अंबाबाई मंदीर सभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनीयुक्त विद्युत खांब बसविणे या कामांचा समावेश आहे.
यामध्ये महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास सन 2022-23 अंतर्गत कदमवाडी प्रभागात वस्तीला जोडणारे रस्ते करणेसाठी रक्कम रुपये 1 कोटी, प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत शहरातील रंकाळा परिसर विकसीत करणे व जतन करणे अंतर्गत रंकाळा तलावाच्या सभोवतालच्या नादुरुस्त झालेल्या दगडी भिंतीची दुरुस्ती करणेसाठी रक्कम रु.2 कोटी 56 लाख 55 हजार, प्र.क्र.33 महालक्ष्मी मंदीर अंतर्गत सरलष्कर भवन येथील भूयारी गटरचे सांडपाणी संत गाडगेबाब पुतळा येथून जोतिबा मंदीर येथील अस्तित्वातील चॅनेलला जोडून निर्गत करणेसाठी रक्कम रु.2 कोटी 47 लाख 20 हजार 145, प्र.क्र.9 कदमवाडी येथील कपूर वसाहत अंतर्गत गटर करणेसाठी रक्कम रुपये 50 लाख, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना सन 2022-23 अंतर्गत प्र.क्र.57 येथील द्वारकानाथ कपूर विद्यालयातील पहिल्या मजल्यावरील हॉल बांधणेसाठी रक्कम रुपये 30 लाख, अल्पसंख्याक बाहुल नागरी क्षेत्रात क्षेत्र विकास योजना सन 2021-22 अंतर्गत शहरातील दक्षिण भागातील अल्पसंख्याक वस्तीमध्ये विविध विकास कामे करणे. प्र.क्र.21 टेंबलाईवाडी येथे काँक्रिट रस्ता करणेसाठी रक्कम रुपये 20 लाख, प्र.क्र.62 अंतर्गत जमादार कॉलनीमधील रस्ता काँक्रिट करणेसाठी रक्कम रुपये 15 लाख, बी डी कामगार चाळ येथे रस्ता करणेसाठी रक्कम रुपये 15 लाख, नेहरुनगर येथे गटर करणे यासाठी रक्कम रुपये 10 लाख. प्र.क्र.21 टेंबलाईवाडी येथे चॅनेल करणेसाठी रक्कम रुपये 20 लाख. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना सन 2022-23 अंतर्गत प्र.क्र.58 येथे रस्ते व गटर करणे यासाठी रक्कम रुपये 30 लाख. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) सन 2022-23 या योजनेअंतर्गत रावणेश्वर मंदीर ते टेंबे रोडपर्यंत फुटबॉल स्ट्रीट विकसीत करणेसाठी रक्कम रुपये 50 लाख. जिल्हा वार्षीक योजना सन 2023-24 अंतर्गत पर्यटन स्थळाचा मूलभूत विकास योजने अंतर्गत शहरातील श्री महालक्ष्मी मंदीर सभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनीयुक्त विद्युत खांब बसविणेसाठी रक्कम रुपये 2 कोटी 11 लाख 25 हजार 388 रुपये इत्यादी कामांना मंजूरी देण्यात आली आहे.